Bol Maharashtra
इतर

अरुणावती नदी वरील लोखंडी कठडे तुटले,अपघाताची श्यक्यता…!

आर्णी: महामार्गाला जोडणारा पूल धोकादायक; अपघाताची शक्यता वाढली, प्रशासन कधी जागे होणार?

आर्णी/प्रतिनिधी:
जिल्ह्यातील एक महत्त्वाची बाजारपेठ आणि तालुक्याचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आर्णी शहराला महामार्गाशी जोडणारा पूल सध्या अत्यंत धोकादायक बनला आहे. शहराच्या प्रवेशद्वारावरच असलेल्या अरुणावती नदीवरील या पुलाची दुरवस्था झाली असून, त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे.
पूर्वी नागपूर – बोरी – तुळजापूर हा महत्त्वाचा महामार्ग आर्णी शहरातून जात होता. मात्र, रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यानंतर हा महामार्ग आता शहराबाहेरून वळवण्यात आला आहे. शहराबाहेर असलेल्या बाबा कंबलपोश दर्ग्याजवळून गावात प्रवेश करताना हा पूल लागतो. याच ठिकाणाहून अरुणावती नदी वाहते.
सद्यस्थितीत या पुलाच्या बांधकामाचा काही भाग खचला आहे. तसेच, सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले पुलाचे कठडे पूर्णपणे गायब झाले आहेत. रात्रीच्या वेळी किंवा खराब हवामानात, कठडे नसल्यामुळे वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही, ज्यामुळे गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
या मार्गावरून केवळ स्थानिक नागरिकच नव्हे, तर बाबा कंबलपोश दर्ग्यावर येणाऱ्या हजारो भाविकांचीही ये-जा असते. त्यामुळे, हा पूल धोकादायक अवस्थेत असणे हे सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे.
यात्रा नजीक आली असून लाखो भाविकांची येथे वर्दळ असते या पुला वरून बाबा कंबलपोष दरगाह रस्ता आहे.

स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी वारंवार तक्रारी करूनही, या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक आमदार यांचे झालेले दुर्लक्ष आश्चर्यकारक आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाला या पुलाची तातडीने पाहणी करून, त्याचे ढासळलेले काम आणि गायब झालेले कठडे त्वरित बसवण्याची गरज आहे. केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता, पुलाची मजबुती तपासून युद्धपातळीवर काम करणे आवश्यक आहे.
आमदारांनी या जनहिताच्या प्रश्नाची गंभीर दखल घेऊन, प्रशासकीय यंत्रणांना त्वरीत निधी उपलब्ध करून देऊन हे काम मार्गी लावावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाला स्पष्ट आवाहन करण्यात येत आहे की, मोठा अपघात घडण्याची वाट न पाहता, तातडीने पुलाचे खचलेले काम दुरुस्त करावे आणि सुरक्षिततेसाठी मजबूत कठडे बसवावे. आर्णी शहराला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या पुलाची दुरुस्ती ही प्राधान्याची बाब आहे.

महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर असलेला पूल अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. त्या पुलाला कोणतेही कठडे नाहीत, त्यामुळे वाहनचालकांना अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. तसेच रस्त्याची तपासणी करून आवश्यक तशी दुरुस्ती करावी. विशेषतः रात्रीच्या वेळी दृश्यमानता कमी असल्याने परिस्थिती आणखी धोकादायक होते. प्रशासनास नम्र विनंती नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा उपाय तत्काळ करावा.

ॲड.राहुल ढोरे, आर्णी

Related posts

पावसाळा झाला आता पूल देतो अपघाताला निमंत्रन..

bol maharashtra

यवतमाळ येथे पोलीस भरती मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन.

bol maharashtra

विधानसभा सामान्य निर्वाचन के मद्देनजर पुलिस और SSB की सयुंक्त टीम ने किया फ्लैग मार्च्

Web1Tech