Bol Maharashtra
निवडणूक महाराष्ट्र राजकारण

५०% आरक्षण मर्यादा ओलांडली आता तेथे दुसऱ्या टप्प्यात निवडणुका..?

राज्य निवडनुक अयोगा कडून प्राशासकिय चूक अंगलट येत असून recerveshation मर्यादा ओलांडून असल्याने काही जिल्हा परिषदेच्या निवडनुका दुसर्या टप्प्यात होइल अशी श श्यक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. यावेळी कोर्टाने या पुढच्या कोणत्याही निवडणुकीत ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडू नका असे सांगितले होते. त्यामुळेच त्याचे नियोजन करण्यासाठी निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदा निवडणुका दोन टप्प्यात घेण्याचा विचार सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले. ज्या ठिकाणी ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडली आहे. त्या ठिकाणच्या जिल्हा परिषद निवडणुका या दुसऱ्या टप्प्यात घेण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा विचार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात घेण्याच्या विचारात आहे. ५० % आरक्षण मर्यादेच्या मुद्द्यावरून हा निर्णय होऊ शकतो. सुरुवातीला १५ जिल्हा परिषदांमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे, तर उर्वरित १७ जिल्हा परिषदांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या 21 जानेवारीच्या सुनावणीनंतर दुसऱ्या टप्प्यात निवडणुका होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Related posts

“नियम कागदावरच,शहर कचऱ्यात!” – ई-रिक्षा चालक व सफाई कर्मचारी गैरहजर;नगरसेवक डॉ.नीरज वाघमारे स्वतः उतरले मैदानात

bol maharashtra

अरुणावती नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक राजेंद्र शिवरामवार यांची बँक प्रतिनिधी म्हणून निवड…!

bol maharashtra

अखेर शिक्रापूरचा कचरा उचलण्यास सुरुवात प्रहार च्या पाठपुराव्यामुळे प्रश्न मार्गी ..!

bol maharashtra