Bol Maharashtra
सामाजिक

नाम फाउंडेशनचा मायेचा हात; सिरेसायगावात गरजू महिला शेतकऱ्यांना बियाणे वाटप

**गंगापूर ता. प्रतिनिधी / शिवाजी गायकवाड**

**सिरेसायगाव :** खरीप हंगामाच्या तोंडावर सिरेसायगाव येथे नाम फाउंडेशनच्या सहकार्याने गरजू महिला शेतकऱ्यांना मका व कपाशी बियाण्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम पर्याय संस्था कळंब आणि श्री स्वामी विवेकानंद समाज सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला.

दुष्काळ, नापिकी आणि वाढत्या शेती खर्चामुळे अडचणीत असलेल्या तीन गावांतील गरीब व अल्पभूधारक महिला शेतकऱ्यांना या उपक्रमातून मदतीचा हात देण्यात आला. नाम फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक विनायक शिनगे, डी. के. साहेब, पर्याय संस्थेचे ऋषिकेश तोडकर तसेच बाबासाहेब नेमाने व सुनील नेमाने यांच्या हस्ते बियाण्यांचे वितरण करण्यात आले.

यावेळी महिला शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. पेरणीच्या काळात मिळालेली ही मदत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार असल्याची भावना लाभार्थींनी व्यक्त केली.

कार्यक्रमास उपसरपंच शरद जगताप, गोरखनाथ नेमाने, पांडुरंग जगताप, लक्ष्मणराव तांबे, अशोक जगताप, अन्वर शेख यांच्यासह तिन्ही गावांतील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश नेमाने यांनी केले.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील नेमाने, अशोक गडकर, अमोल नेमाने, अक्षय वायकोस, किशोर वायकोस व शेखनाथ कोळेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related posts

बाजारपेठेच्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी ठोस उपायाची गरज!

bol maharashtra

शिक्रापूर (कोयाळी ) गावठाण येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी ..!

bol maharashtra

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच सुनेत्राताईंनी केली भावूक पोस्ट,स्व.दादांची शिकवण हेच बळ..!

bol maharashtra