Bol Maharashtra
राजकारण

श्रीनिवास मंगनाळे यांची शिवसेना तालुका समन्वयकपदी नियुक्ती

सहसंपादक / विश्वनाथ शिंदे

**जळकोट :*- * शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीने जळकोट तालुका समन्वयकपदी विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले **श्रीनिवास मंगनाळे** यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती उपमुख्यमंत्री **एकनाथ शिंदे**, खासदार **श्रीकांत शिंदे**, यांच्या आदेशाने शिवसेना सचिव **संजय मोरे **, लोकसभा संपर्कप्रमुख आमदार **मंगेश कुडाळकर** तसेच पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. शिवसेनेचे लातूर जिल्हा प्रमुख चंद्रकांत टेंगेटोल पाटील व लातूर जिल्हा संघटन प्रमुख माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या स्वाक्षरीने त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे

पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी मंगनाळे यांची निवड करण्यात आल्याचे नियुक्ती पत्रामध्ये सांगण्यात आले.

नियुक्तीनंतर विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, शिवसेनेचे लातूर जिल्हाप्रमुख **चंद्रकांत टेंगेटोल पाटील**, मौला शेख, फैजान शेख, माजीद बागवान, रमाकांत ढोले, किरण वाघमारे, सुशील नामवाड आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

श्रीनिवास मंगनाळे यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत संघटना बळकट करण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Related posts

स्व.अजित दादांना आर्णीत श्रद्धांजली, परवेज बेग मित्र परिवारा कडून श्रद्धांजली सभेचे आयोजन..!

bol maharashtra

स्व.दादांचे ते स्वप्न राहिले अपूर्णच…!

bol maharashtra

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच सुनेत्राताईंनी केली भावूक पोस्ट,स्व.दादांची शिकवण हेच बळ..!

bol maharashtra