Bol Maharashtra
राजकारण

शिवसेनेच्या अल्पसंख्याक विभागात खदीर लाटवाले यांची जळकोट शहर प्रमुखपदी नियुक्ती

सह संपादक/विश्वनाथ शिंदे

**जळकोट :*- * शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीने जळकोट अल्पसंख्यांक विभाग शहराध्यक्षपदी विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले **खदीर लाटवाले** यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती उपमुख्यमंत्री **एकनाथ शिंदे**, खासदार **श्रीकांत शिंदे**, यांच्या आदेशाने शिवसेना सचिव **संजय मोरे **, लोकसभा संपर्कप्रमुख आमदार **मंगेश कुडाळकर** , विधीज्ञ श्रीनिवास क्षिरसागर, शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान तसेच पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. शिवसेनेचे लातूर जिल्हा प्रमुख चंद्रकांत टेंगेटोल पाटील व लातूर जिल्हा संघटन प्रमुख माजी आमदार सुधाकर भालेराव, शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाप्रमुख जावेद युसुफ बागवान यांच्या स्वाक्षरीने त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी खदीर लाटवाले यांची निवड करण्यात आल्याचे नियुक्ती पत्रामध्ये सांगण्यात आले.

नियुक्तीनंतर विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, शिवसेनेचे लातूर जिल्हाप्रमुख **चंद्रकांत टेंगेटोल पाटील**, मौला शेख, फैजान शेख, माजीद बागवान, रमाकांत ढोले, किरण वाघमारे, सुशील नामवाड आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

खदीर लाटवाले यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत संघटना बळकट करण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Related posts

भाजप उमेदवार पंडा गायकवाड यांनी फोडला प्रचाराचा नारळ,उस्फुर्त प्रतिसाद,ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरातून श्री गणेशा..!

bol maharashtra

अखेर माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद सदनिका घोटाळ्यात गेलेच…!

bol maharashtra

शिरूर नगराध्यक्ष पदी राष्ट्रवादीच्या ऐश्वर्या पाचर्णे,भाजप चे मात्र सभागृहात वर्चस्व..!

bol maharashtra