Bol Maharashtra
बिना केटेगरी राजकारण

आंदोलनास यश जिल्हाप्रमुख राजुदास जाधव यांनी दिलेला शब्द,पालकमंत्री राठोड यांनी पाळला…!

सिसोदिया ले आऊट-ग्रीनपार्क च्या पुरुष-महिला नागरिकांनी मोठे आंदोलन केले होते. साखळी उपोषण सुरू केले होते यात शेकडो अबाल वृद्ध नागरिक सहभागी झाले होते. आर्णी च्या इतिहासात हे मोठे जनआंदोलन ठरले होते
या आंदोलनास शहरातील अनेक राजकीय पक्षांच्या नेते व पदाधिकारी यांनी भेट दिली होती मात्र
केवळ आश्वासन देण्यात आले होते.मात्र शिवसेना यवतमाळ जिल्हा प्रमुख राजुदास जाधव यांनी तेथे जाऊन नागरिकांना शब्द दिला प्रशासनास धारेवर धरले आणि जुन्या ठिकाणचे रोहित्र (डी.पी.)बदलुन नवीन रोहित्र बसविण्यात यावे ही मागणी होती त्यासाठी राजुदास जाधव यांनी यवतमाळ जिल्ह्यात चे पालकमंत्री ना.संजय राठोड यांना साकडे घातले व त्यांनी देखील आपल्या जिल्हा प्रमुखांचा शब्द पाळला आणि नवीन डी पी रोहित्र मंजूर केले.
झालेले जनआंदोलन हे कुणाल मनवर,राजू राऊत यांच्या पुढाकारारत व सिसोदिया ले आऊट मधील प्रतिष्ठित नागरिकांनी सुरू केले होते.आज प्रत्यक्षात नव्या डी पी च्या कामाला सुरुवात झाली त्यामुळे नागरिकांनी जिल्हा प्रमुख राजुदास जाधव व पालकमंत्री ना.संजय भाऊ राठोड यांचे आभार मानले.

Related posts

जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालणा देणार :ना. संजय राठोड

bol maharashtra

पांढरकवडा विकासासाठी जय विरु ची जोडी विजयाचा शोले करतील:ना.एकनाथ शिंदे

bol maharashtra

पक्ष प्रवेशाच्या खेळीने भाजप मधील नाराजी नाट्य शमणार…?

bol maharashtra