Bol Maharashtra
Last 24 Hour निवडणूक राजकारण

घाटंजीतून फुंकले काँग्रेसने जिल्हा परिषद निवडणुकीचे रणशिंग…!

घाटंजी तालुक्यातील पारवा येथे काँग्रेसचा निर्धार; माजी मंत्री ॲड. शिवाजीराव मोघे यांची उपस्थिती
( आगामी जिल्हा परिषद – पंचायत समितीचे फुकले रणशिंग)
घाटंजी / प्रतिनिधी
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज (दिनांक ०४ फेब्रुवारी) रोजी पारवा येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उत्साहवर्धक बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या माध्यमातून काँग्रेसने आपल्या निवडणूक प्रचाराची अधिकृत रणनीती आखली असून कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा विश्वास निर्माण केला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद राज्याचे माजी मंत्री ॲड. शिवाजीराव मोघे यांनी भूषवले. त्यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या शिदोरीतून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आगामी निवडणुकांसाठी विजयाची ठोस रणनीती आखून दिली. या बैठकीमुळे संपूर्ण घाटंजी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एक नवी ऊर्जा संचारली आहे.
याप्रसंगी व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकरावजी भोयर, जिल्हा काँग्रेस समितीचे सरचिटणीस जितेंद्र मोघे, तालुका अध्यक्ष रुपेश कल्यमवार आणि माजी समन्वय समिती अध्यक्ष ईकलाख खान यांची प्रमुख उपस्थिती होती. या नेत्यांनी आपल्या भाषणातून जनसेवेचा संकल्प व्यक्त करत पक्ष संघटनेला अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.
या महत्त्वपूर्ण बैठकीला काँग्रेसचे अनेक दिग्गज पदाधिकारी आणि निष्ठावान कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये ॲड. विजय मोरे, कांबळे साहेब, राम वाजपेयी, आकाश आत्राम, प्रजय कडू, राजेश निकोडे, बाबाजी पोटपेल्लीवार, जनार्धन रेड्डी, नामदेवराव भोयर, अरविंद चौधरी, अशोक जिलरवार, बळीराम उईके, राजुभाऊ हिवणे, मोहूर्ले सर, सुनिल हुड, अक्षय पवार, बाबुभाई शेख, निलेश कडू, पुंजाजी आत्राम, विजय हेवतळे, संजय कोल्हे, गणेश वलपवार, दिपक भवरे, नारायण ठाकरे, पुंडलिक बिबेकर आणि राहुल आत्राम या सर्वांचा प्रामुख्याने समावेश होता.
कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण प्रास्ताविक गणेश मुद्दुलवार यांनी केले. येणाऱ्या काळात जनसेवेचा हा रथ असाच जोमाने पुढे नेण्यासाठी आणि घाटंजी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्व काँग्रेसजन पूर्ण ताकदीने कटिबद्ध आहोत, असा ठाम विश्वास या मेळाव्यातून व्यक्त करण्यात आला. शेवटी “विजय आपलाच आहे” अशा घोषणांनी हा मेळावा यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Related posts

एकट्या रुपाली चाकनकरच का सर्वांची चौकशी व राजीनामा झाला पाहिजे: रेवननाथ गायकवाड.

bol maharashtra

आर्णीत धडकनार एम आय एम चे वादळ,राजकीय समीकरणात होणार मोठे बदल,युसूफ पुंजानी यांचा दौरा..!

bol maharashtra

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व सहकार क्षेत्रात शिवसेची शक्ति वाढली,अनेक दिगग्ज शिवसेनेत…

bol maharashtra