Bol Maharashtra
निवडणूक

यवतमाळ नगर परिषद: आजी-माजी मंत्र्यांची ‘प्रतिष्ठा’ पणाला.!

यवतमाळ नगर परिषद: आजी-माजी मंत्र्यांची ‘प्रतिष्ठा’ पणाला.!

यवतमाळ/ प्रतिनिधी
यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी जाहीर झाल्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांची दमदार उमेदवार शोधताना दमछाक झाली. मात्र, यातूनही राष्ट्रीय पक्षांनी कंबर कसून आपल्या बड्या नेत्यांच्या कुटुंबीयांना मैदानात उतरवले आहे. यामुळे ही लढत केवळ पक्षांमध्ये न राहता, थेट आजी आणि माजी मंत्र्यांच्या प्रतिष्ठेची लढाई बनली आहे.

▪️ प्रमुख लढत: मंत्र्यांच्या वारसदार आमने-सामने

भारतीय जनता पक्षाने (भाजप) विद्यमान आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची कन्या अँड. प्रियदर्शनी उईके यांना उमेदवारी दिली आहे. तर, काँग्रेस पक्षाने माजी सामाजिक न्याय मंत्री अँड. शिवाजीराव मोघे यांच्या स्नुषा (सून) प्रियंका जितेंद्र मोघे यांना उमेदवारी देऊन निवडणुकीचे लक्ष वेधले आहे.
या प्रमुख उमेदवारांमुळे, ही निवडणूक दोन राजकीय घराण्यांमधील थेट लढत म्हणून पाहिली जात आहे. नगराध्यक्षपदाची ही चुरस आता केवळ राजकीय समीकरणे नसून, दोन आजी-माजी मंत्र्यांच्या राजकीय भविष्याची परीक्षा ठरण्याची शक्यता आहे.
▪️ इतर पक्षही मैदानात
प्रमुख लढतीसोबतच इतर पक्षांनीही आपले उमेदवार रिंगणात उतरवून चौरंगी लढतीची रंगत वाढवली आहे.
शिंदे गट (शिवसेना), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्याकडून तेजस्विनी राजू चांदेकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैष्णवी नरेश कोवे, वंचित बहुजन आघाडी कु. चंचल मसराम असे उमेदवार रिंगणात उतरवून या निवडणुकीत दावेदारी दर्शविली आहे.
▪️ काँग्रेसचे पारडे जड.?
सध्याच्या राजकीय समीकरणांमध्ये, यवतमाळ शहरात काँग्रेसचे आमदार निवडून आलेले आहेत. तसेच, या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडे माजी मंत्री अँड. शिवाजीराव मोघे यांच्यासह डझनभर माजी मंत्र्यांचा मोठा फौजफाटा प्रचारासाठी उपलब्ध आहे. स्थानिक आमदार आणि अनुभवी नेत्यांच्या या बळामुळे, निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे पारडे काहीसे जड असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
याउलट, भारतीय जनता पक्षाकडून माजी मंत्री मदन येरावार यांच्यासह अन्य स्थानिक नेत्यांच्या खांद्यावर प्रचाराची मुख्य जबाबदारी असणार आहे.
यवतमाळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी ही निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असून, या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
▪️ माधुरी मडावी यांचे नाव बाद – पण प्रचारात सक्रिय
आपल्या आक्रमक आणि धडाकेबाज निर्णयाने नेहमी चर्चेत राहिलेल्या यवतमाळच्या माजी मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी काँग्रेस कडून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करून यासाठी जोरदार मोर्चे बांधणी केली होती. मात्र, तांत्रिक बाबींचे आलेल्या व्यत्याने मडावी यांच्या उमेदवारीत बाधा निर्माण झाला आणि ऐनवेळी हे नाव शर्यती मधून बाद झाले. त्यामुळे माधुरी मडावी यांची लोकप्रियता आणि धडाकेबाज व्यक्तिमत्व आता काँग्रेसच्या प्रचारात स्टार प्रचारक म्हणून सामोर येईल.

Related posts

आर्णी नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गट नेतापदी निलोफर साजिद बेग यांची एकमताने निवड…!

bol maharashtra

पचास गुना ज्यादा ताक़त से लड़ूंगा चुनाव,5 वर्षों तक जनता के सुख दुख में रहा शामिल-अरशद खुर्शीद

Web1Tech

वर्षाताई वसंतराव शिंदे बँक प्रतिनिधी म्हणून अविरोध…!

bol maharashtra