Bol Maharashtra
इतर

हजारोंच्या उपस्थितीत साश्रु नयनांनी स्व.प्रमिलादेवी राठोड यांना निरोप..!

यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री लोकनेते विकास पुरुष ना.संजय राठोड याच्या मातोश्री प्रमिला देवी दुलीचंद राठोड यांचे वृद्धापकाळात अल्पशा आजाराने निधन झाले.
ही वार्ता कळताच दोन तीन दिवस जिल्हा व राज्यातील शिवसेना पदाधिकारी, नेते,आमदार खासदार मंत्री माजी लोकप्रतिनिधी यांनी ना.संजय भाऊ राठोड यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
बुधवारी स्व.प्रमिलादेवी राठोड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी हजारोंच्या संख्येने साश्रु नयनांनी अखेरचा निरोप दिला. ना.संजय भाऊ राठोड यांनी चितेला भडाग्नी दिला.
यावेळी संपुर्ण राठोड कुटुंब दुःखसागरात बुडलेले दिसत होते.
कळंब तालुक्यातील शिवपुरी पहूर या मूळ गावी प्रमिलादेवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रमिलादेवी ह्या मोठ्या परिश्रमी होत्या पती दुलीचंद राठोड हे आदर्श शेतकरी आहेत त्यांना शेतीत समर्थ साथ देत मोठ्या मेहनतीने संपुर्ण कुटुंब एकत्र बांधून सर्वावर चांगले शिक्षण,संस्कार दिले.
मोठा मुलगा विजय हे जिल्हा परिषद सभापती तर लहान चिरंजीव ना.संजय राठोड हे यवतमाळ जिल्ह्याचे शिवसेना पक्षा कडून पालकमंत्री आहेत.

Related posts

ग्रामीण विकास मिशन च्या यवतमाळ प्रकल्प संचालक पदी अभिलाष इंगोले नियुक्त.. !

bol maharashtra

पावसाळा झाला आता पूल देतो अपघाताला निमंत्रन..

bol maharashtra

नगरपरिषद च्या कर निर्धारणा विरुद्ध प्रवीण मुनगीनवार यांनी थोपटले दंड…!

bol maharashtra