Bol Maharashtra
इतर सामाजिक

यवतमाळ येथे पोलीस भरती मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन.

 

यवतमाळ येथे पोलीस भरती मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन.

आगामी काळात पोलीस भरती, महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षा होऊ घातल्या आहेत.
या परीक्षांमध्ये शहर व जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांना शासकीय सेवेची संधी मिळावी यासाठी डॉ.नीरज वाघमारे, गटनेता तथा नगरसेवक, नगरपरिषद यवतमाळ तसेच जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, यवतमाळ यांचे पुढाकाराने यवतमाळ शहर व जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार व स्पर्धा परीक्षांचे परीक्षार्थी, युवक युवती, यांना स्पर्धा परीक्षांचे सुयोग्य मार्गदर्शन व्हावे, यासाठी दिनांक १७ जानेवारी २०२६ ला डॉ.नंदुरकर विद्यालयाचे प्रांगण,यवतमाळ येथे सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते प्रा.विठ्ठल कांगणे यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या मार्गदर्शन मेळाव्याला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजर राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. नीरज वाघमारे यांनी केले आहे.

Related posts

देशाला सत्पुरुषांची गरज आहे ते शाळेमधून घडले पाहीजे… नगराध्यक्ष नालंदा भरणे…

bol maharashtra

विधान सभा सामान्य निर्वाचन- 2022 को सकुशल सम्पन्न कराने हेतु थाना- शोहरतगढ़ व एसएसबी की संयुक्त टीम ने किया एरिया डोमिनेशन 

Web1Tech

हजारोंच्या साक्षीने साश्रु नयनांनी स्व.वसंतराव शिंदे अनंतात विलीन…!

bol maharashtra