Bol Maharashtra
इतर सामाजिक

देशाला सत्पुरुषांची गरज आहे ते शाळेमधून घडले पाहीजे… नगराध्यक्ष नालंदा भरणे…

देशाला सत्पुरुषांची गरज आहे ते शाळेमधून घडले पाहीजे… नगराध्यक्ष नालंदा भरणे…
आर्णी :-
शाळा हे विद्यार्थ्यांना सुद्य नागरिक म्हणून नावारूपास आणणारे केंद्र आहे. इथे बालमनावर योग्य संस्कार करून देशाचा सुजान नागरिक केले जाते. परंतु देशाला सत्पुरुषांची गरज आहे. सत्पुरुष हे केवळ शैक्षणिक संस्थाच घडऊ शकतात. चांगले विचार, चांगले वर्तण,योग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ध्येयापर्यंत पोहचले जाते. त्यांच्यामध्ये योग्य मुल्य जोपासण्यासाठी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. शिकलेला व्यक्ती केवळ आपल्या कुटुंबासाठी जगत असतो. परंतू सत्पुरुष मात्र देशासाठी, समाजासाठी जगतो म्हणून आपल्याला सत्पुरुष निर्माण करणारे शिक्षण विद्यार्थांना द्यावे असे प्रतिपादन नगराध्यक्ष नालंदा भरणे यांनी व्यक्त केले..
स्थानिक स्व उत्तमराव देशमुख इंग्लिश मिडियम स्कुल व मातोश्री शांताबाई तु चव्हाण विद्यालय आर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी २६ रोजी सकाळी ११ ते ५ ला सप्तरंग २०२६ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ पंडितराव चव्हाण तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष नालंदा भरणे, बालकल्याण सभापती चैताली देशमुख, नगरसेवक विशाल मनवर, भाजपचे शहराध्यक्ष विशाल देशमुख, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी किशोर रावते, प्रशासन अधिकारी सचिन तिरपुडे, संस्थेचे व्यवस्थापक उल्हास चव्हाण, गणेश मोरे, शाळेचे मुख्याध्यापक मंगेश ब्रम्हकार, कु कोमल चव्हाण उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून सप्तरंग 2026 चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नर्सरी ते दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांनी आपले नृत्य सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश ब्रम्हकार, सुत्र संचालन आशिष मोरे तर आभार उल्हास चव्हाण यांनी मानले..
(बातमी सोबत फोटो घेणे )

Related posts

रेती अभावी जवळ्यात घरकुल रखडले…योजनेचा फायदा काय…?

bol maharashtra

क्रांतिवीर बाबुराव शेडमाके जयंती उत्सव समिती गठीत

bol maharashtra

आर्णीत धडकनार एम आय एम चे वादळ,राजकीय समीकरणात होणार मोठे बदल,युसूफ पुंजानी यांचा दौरा..!

bol maharashtra