Bol Maharashtra
Last 24 Hour ब्रेकिंग मोठी बातमी सामाजिक

रेती अभावी जवळ्यात घरकुल रखडले…योजनेचा फायदा काय…?

गरिबांना हक्काचे घर मिळावे म्हणून केंद्र सरकारने पंतप्रधान घरकुल योजना आणली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक पंचायत समितीच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर घरकुल मंजूर झाले
घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास रेती उपलब्ध करून देण्याचा लोकप्रिय निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. उदासीन प्रशासन त्याची अंमलबजावणी करताना दिसत नाही.
आर्णी तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत हजारावर घरकुल मंजूर करण्यात आले
तालुक्यातील जवळा हे मोठे बाजार पेठेचे गाव लोकसंख्या देखील जास्त
या गावात ऑगस्ट २०२५ ला महसूल सप्ताह साजरा करण्यात आला तेव्हा जागेच्या लिझ पट्ट्यासोबत सुमारे १६५ घफकुल मंजूर झाले तेव्हा घरकुल लाभार्थी लोकांनी रेती बाबत महसूल विभागाच्या अधिकारी वर्गास विचारना केली असता आता नदीला पाणी आहे कोणी बुडून मेले तर असा प्रति प्रश्न केला..आता मात्र नदी पात्रातून रेती ची वाहतूक सुरू आहे.पण घरकुल धारकांना रेती मिळत नाही आर्णी
पंचायत समिती चे गटविकास अधिकारी संवेदनशील आहे पण ज्याच्या कडे पंचायत विभाग आहे ते विस्तार अधिक8 मात्र या गंभीर बाबी कडे दुर्लक्षच करत असल्याने गरीब लोकांचे घरकुल बांधकाम थांबले आहे.
महसूल व तहसिल प्रशासनाने एकत्रित बसून यावर तोडगा काढला नाही तर गरिबांचा उद्रेक झाल्या शिवाय रहाणार नाही

Related posts

भीमा कोरेगाव विजयस्तंभ कार्यक्रमासाठी वाहतूक बदल चाकण, शिक्रापूर, वाघोली मार्गांवर निर्बंध

bol maharashtra

यवतमाळ येथे पोलीस भरती मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन.

bol maharashtra

महामार्ग अधिकाऱ्यांच्या हस्ते ‘अघोरी पूजेचे’ घाट  (हिवरा संगमच्या तरुणाचे चक्क अनिसला पत्र ) 

bol maharashtra