Bol Maharashtra
निवडणूक महाराष्ट्र मोठी बातमी राजकारण

काका पुतण्या च्या युतीला अमित शहाचा हिरवा कंदील…!

शिवसेनेत बंद होऊन फूट पडल्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील फूट पडली.
शिवसेनेचे नाव व मूळ धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या कडे राहिले ते अडीच वर्षे मुख्यमंत्री झाले याच काळात राष्ट्रवादी काँग्रेस चे मूळ नाव व घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्या कडे आले विशेष म्हणजे दोन्ही पक्ष फुटून सत्तेत सहभागी झाले.२०२४ ची लोकसभा व विधानसभा निवडणूक तिन्ही पक्षांनी एकत्र लढवली आणि अपूर्व बहुमत मिळवले.
पण भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे व अजित पवार उपमुख्यमंत्री झाले मात्र अजित पवार यांनी अर्थ खाते राखण्यासाठी जोर लावला तो यशस्वी देखील झाला.
आता ९ वर्षा पासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या त्यात नगर पालिका नगर परिषद व पंचायत निवडणुका पार पडल्यानंतर कुठे महा युती तर कुठे सत्तेतील तिन्ही पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने लढले.
मात्र आता महानगर पालिकेच्या निवडणूका घोषित झाल्या या निवडणुकीत अनेक ठिकाणी सत्ताधारी तिन्ही पक्ष वेगवेगळे लढले जरी ते मैत्रीपूर्ण लढत म्हणत असले तरी स्थानिक पातळीवर बेबनाव यास कारणीभूत ठरला.
महा विकास आघाडी ची तीच गत झाली काही ठिकाणी युती झाली मात्र बहुतेक ठिकाणी नेत्यांचा इगो आडवा आला.
आता भारतीय जनता पक्षाला कोणत्याही परिस्थितीत मुंबई जिंकणे महत्वाचे आहे तर गेली २५ वर्ष येथे शिवसेनेची सत्ता आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे की शिवसेना जी आज एकनाथ शिंदे यांच्या कडे आहे ती खरी याचा निकाल अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.मात्र मुंबईत बशुतांशी शिवसेनेच्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे एकनाथ शिंदे यानाही ही निवडणूक महत्वाची आहे.
या साठी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी मराठी हा मुद्दा हाती घेतला तर भाजप व एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्व हा मुद्दा हाती घेतला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सोबत राज ठाकरे आल्याने कॉंग्रेस स्वतंत्र लढणार आहे कारण परप्रांतीय मते काँग्रेस जवळून दूर जाऊ नये हा काँग्रेस चा हेतू आहे
तिकडे एकनाथ शिंदे यांच्या मुले मराठी मते मिळतील व गुजराती व हिंदू मते मिळवण्यासाठी नवाब मलिक चे काहीतरी कारण पुढे करत राष्ट्रवादी अजित पवार यांना भजप सेने ने दूर केले आहे
भाजपला नवाब मलिक ची मुलगी सना मलिक सत्तेत चसळते पण हिंदू मता साठी नवाब मलिक नको आहे
ही भूमिका भाजप ने घेतल्याने दिल्लीत प्रफुल पटेल सुनील तटकरे यांनी अमित शाह याची भेट घेतली अन काँग्रेस किंवा उबाठा कडे मुस्लिम गठ्ठा मते जाऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षा सोबत युती करावी का असे विचारले तेव्हा या प्रस्तावाला अमित शहा यांनी हिरवी झेंडी दाखवकी
मुंबई महा नगर पालिकेत सत्ता स्थापन करते वेळी जर संख्या कमी पडली तर मग मात्र पुन्हा नवाब मलिक मुद्दा सोडून भाजप राष्ट्रवादी एकत्र येतील हे सांगायला ज्योतिषी लागत नाही.

Related posts

सशस्त्र सीमा बल जवानों ने चावल की तस्करी करते हुए एक तस्कर को पकड़ा

Web1Tech

आर्णी तालुका कृषी कार्यालयातील भ्रष्टाचारा विरुद्ध विजय राठोड यांचा एल्गार…!

bol maharashtra

पोलिस बंदोबस्तात शिक्रापूर उपसरपंच पदाची निवडणूक उपसरपंच पदी त्रिनयन कळमकर विजयी..!

bol maharashtra