Bol Maharashtra
कृषी महाराष्ट्र सामाजिक

जिल्हास्तरीय कृषीतांत्रिक समितीच्या सदस्यपदी शिवसेनेचे संपर्क प्रमुख हरिहर लिंगणवार यांची निवड…!

*जिल्हास्तरीय कृषी तांत्रिक समिती सदस्यपदी हरिहर लिंगणवार यांची नियुक्ती*
सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील रब्बी, खरीप पीक यांचे कृषिमूल्य दर ठरविणे तसेच पशुपालन, मस्त्यपालन शेतकऱयांना कृषी पिकासह त्यांच्या व्यवसायाना कर्ज दर ठरविण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षते खाली एक कृषी तांत्रिक समिती असते त्यांची वर्षातून एक सभा घेऊन कृषिमूल्य दर व कर्ज मर्यादा ठरवून ती शासनाच्या राज्यस्तरीय समिती मार्फत शासनाला पाठविल्या जातात त्या समितीत हरिहर लिंगणवार यांची सदस्य पदी नियुक्ती करण्याकरिता जिल्हा उपनिबंधकाने जिल्हा बँकेकडे शिफारस केली त्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँकेने तज्ज्ञ शेतकरी म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे.
हरिहर लिंगणवार यांच्या कडे पिंपळशेंडा ता. पांढरकवडा येथे ३० एकर बागायती शेती असून ते २९९५ पासून शेती करतात त्या मध्ये विविध प्रकारचे रब्बी, खरीप पिके घेतं असून त्यांनी पशुपालणाचा प्रयोग सुद्धा केला होता दरवर्षी ते शेतीत नवनवीन प्रयोग करून शेतकऱ्यांना प्रोतहीत करीत असतात. नुकतीच त्यांनी यावर्षी ५ एकर नैसर्गिक आंब्याची लागवड केली आहे त्यांचा शेतीतील दांडगा अनुभव व शेत पिकाला लागणार खर्च, त्या पासून मिळणारे उत्पन्न व होणारा नफा की तोटा तसेच कर्ज वितरणाची मर्यादा ठरवण्यास त्यांच्या अनुभवाचा शेतकऱ्यांना फायदाच होईल. परिसरातील शेतकऱ्याच्या त्यांच्या नियुक्ती मुळे अशा पल्लवीत झाल्या आहेत

Related posts

शिवसेना उबाठा समोर नवा पेच…भास्कर की आदित्य..? आदित्य ठाकरेंनी वृत्त फेटाळले…!

bol maharashtra

रेती अभावी जवळ्यात घरकुल रखडले…योजनेचा फायदा काय…?

bol maharashtra

स्मार्ट मिटर व थकीत वीजबिलासाठी आर्णी विजविरण ची जागृती मोहीम…!

bol maharashtra