भारतीय जनता पक्षाचे दिलेला शब्द पाळला नाही म्हणून
उद्धव ठाकरे यांनी २०२९ ला महा विकास आघाडी चा प्रयोग केला पण यावेळी त्यांनीच मुख्यमंत्री व्हावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस चे शरद पवार यांचा आग्रह होता.
त्यात कोरोना आला अन नंतर विधानपरिषद निवडणूक व राज्य सभा निवडणूक आली येथूनच शिवसेना फुटीचे नाट्य लिहल्या गेले तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे १५ आमदार घेऊन पक्षाच्या बाहेर गेले त्यांना परत आणण्याची विनंती सोडून खासदार संजय रसुत वेगवेगळ्या प्रकारच्या विधानामुळे आणखी २५ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले तरी त्यांना गद्दार म्हणून डीवाचण्यात आले मात्र एकनाथ शिंदे यांनी यास उठाव व बंद म्हटले
उद्धव ठाकरे यांनी आपले पद सोडले तेव्हा त्यांना प्रचंड सहानुभूती मिळाली.
इकडे एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्षाने थेट मुख्यमंत्री केले.
मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे यांनी अनेक योजना राबविल्या.सोबतीला अजित पवार पक्ष सोडून महा युतीत सहभागी झाले
लोकसभा निवडणुकीत महा विकास आघाडी ला मोठे यश मिळाले पण नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली तूट १५०० रुपये महिलांना खात्यात दिले ते विधानसभा निवडणुकी पर्यंत ७५०० रुपये झाल्स अन लोकसभा विजया च्या आनंदात असळसल्या महा विकास आघाडी चा सफाया झाला त्यात शिवसेना उबाठा राष्ट्रवाडी काँग्रेस शरद पवार व काँग्रेस ला सपाटून पराभवास समोर जावे लागले.
विधानसभा सभागृहात विरोधी पक्ष नेता स्वबळावर होईल एवढी संख्या कोण्या एका पक्षा कडे नसल्याने आता सर्व एकत्र येत शिवसेनेचे संख्याबळ २० असल्याने त्यांनी विरोधी पक्ष नेत्यांचा दावा केला
यात भास्कर जाधव याचे नाव शिवसेना उद्धव ठाकरे यांनी दिले सुद्धा मात्र त्यावर निर्णय झाला नाही
आता नागपूर अधिवेशनात पुन्हा विरोधीपक्ष नेता हा विषय पुढे आला अन आता या वडा साठी आमदार आदित्य ठाकरेंचे नाव अचानक चर्चेत आले.
आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर मवा पेच निर्माण झाला आहे.
जर भास्कर जाधव यांना विरोधी पक्ष नेता बनवले नाही तर ते शिवसेनेतून बाहेर पडतील अशी भीती आहे मात्र आदित्य ठाकरे यांनी हे वृत्त फेटाळले उलट त्यांनी शिवसेनेचे २० आमदार एकनाथ शिंदे यांना सोडून भारतीय जनता पक्षात जातील असे भाकीत केले.मात्र या निमित्ताने पुन्हा एकदा महा नगर पालिका निवडणुकी पूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात काही घडले तर नवक नको.
