Bol Maharashtra
सामाजिक

१४ मुलाच्या आई ने विकली ६ मुले..?तपास सुरू दत्तक दिल्या चा आई चा दावा..!

गरिबी माणसाला कुठला निर्णयघ्यावा लाभेल सांगता येत नाही. ज्यांना मूळ बाळ नाही त्यांना मूळ व्हावे म्हणून आई वडील नवस भक्ती करतात वैद्यकीय तपासणी करून लाखो रुपये खर्च करतात पण नहू महिने पोटात वाढवून प्रसूती च्या वेदना सहन करणाऱ्या मातेने गरिबीला कंटाळून चक्क ६ मुले विकली असल्याने एकच खळबळ उडाली.
मात्र ४५ वर्षीय महिलेने १४ मुलांना जन्म दिला त्यातील ६ मुले विकली असल्याचा संशय व्यक्त होत आहे. मात्र आपण मूळ विकली नाही तर दत्तक दिली असा युक्तिवाद त्या महिलेने केले आता तपासातून सत्य पुढे येईल.

नाशिकच्या त्रंबकेश्वर येथील आदिवासी महिलेने तब्बल १४ मुलांना जन्म दिला. वयाच्या ४५ व्या वर्षी ही महिला १४ मुलांची आई बनली. मात्र, याच आईने पोटच्या मुलांसोबत धक्कादायक कृत्य केले. महिलेच्या या कृत्यामुळे आश्चर्य आणि संतापही व्यक्त केला जात आहे. या भागातील एल्गार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमुळे या महिलेचे कृत्य जगासमोर आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की nashik police या घटनेची चौकशी करत आहे.

अधिकची माहिती अशी की, नाशिकच्या त्रंबकेश्वर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत टाके देवगाव पैकी बरड्याची वाडी या गावात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय महिलेने तब्बल १४ मुला मुलींना जन्म दिला. मात्र या महिलेने घरची परिस्थिती हलाकीची असल्याने या १४ मुला मुलींपैकी ६ मुलं विकल्याची माहिती समोरं आली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव या आदिवासी बहुल भागातील बरड्याची वाडी या गावात ही महिला राहते. या ४५ वर्षीय महिलने तब्बल १४ मुला मुलींना जन्म देत यापैकी तब्बल 6 हून अधिक मुला मुलींची पैशासाठी विक्री केल्याचा संशय यंत्रणांनी व्यक्त केला आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांकडून घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी मध्यरात्री तपास सुरू केला आहे, बाळाचा शोध घेण्यासाठी तीन पथके रवाना करण्यात आली आहेत

10 ऑक्टोबर 2025 ला महिलेला मुलगा झाला. या अपत्याच वजन कमी असल्याने आरोग्य विभागाने या अपत्याच्या तपासणीसाठी आशा कर्मचाऱ्यांना या महिलेच्या घरी पाठवले. मात्र या महिलेच्या घरी अशा कर्मचारी गेल्यानंतर या महिलेने तिचं पोटचा बाळ विकल्याच सांगितलं आणि त्यानंतर या सगळ्या प्रकाराचं बिंग फुटला आहे. पैशासाठी मुलांची विक्री केल्याच्या या घटनेचा शोध घेण्यासाठी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकी देवगावचा बाराड्याची वाडी येथे सामजित कार्यकर्ते पोहचले. मात्र, ही महिला आणि तिचा नवरा घरात नव्हते, यावेळी घरात असलेल्या या महिलेच्या इतर मुलांकडून या सगळ्या प्रकाराबाबत माहिती जाणून घेतली तेव्हा या मुलांनी जी माहिती दिली ती धक्कादायक होती. आमच्या आई-वडिलांनी दहा हजार रुपयांसाठी आमच्या भावाला विकलं. एका भावाला शहापूरला तर एका भावाला जवळच असलेल्या नातेवाईकाला मुलगा होत नसल्याने विकलं अशी माहिती दिली. तर सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांनी या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

बाळाला विकले नाही तर नातेवाईकांना दत्तक दिल्याची कबुली या बाळाच्या आई-वडिलांनी दिली. या प्रकरणात जिल्हा प्रशासनाकडून समिती देखील गठीत करण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. घोटी पोलिसांकडून तात्काळ या मुलांचा शोध घेण्यासाठी तीन पथके शहापूर, ठाणे आणि इतर भागात रवाना करण्यात आली आहे.

सबंधित महिला स्पष्टीकरण देताना काय म्हणाली ?

“माझ्या नातेवाईकांकडेच मुलांना दत्तक दिले आहे. विक्री करून पैसे घेतले नाही, आमची परिस्थिती हालाखीची असल्याने मुलं दत्तक दिली,” असे तिने सांगितले. मला एकूण बारा मुलं आहेत त्यापैकी तीन मुलं दत्तक दिली आहेत.. तर तीन मुलींचं लग्न झालं आहे. पाच मुलं माझ्याकडे असल्याची माहिती आईने दिली. मात्र अजून एक मुलासंदर्भात आईला देखील पूर्णपणे माहिती देता आलेली नाही.
Cmo maharastra

Related posts

श्री कान्होबा महाराज देवस्थान, म्हसोला – अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा,राजू भाऊ विरखडे यांनी दिली भेट…

bol maharashtra

आर्णीकरांना आता ‘बिबट्या’चे भय,तरुणावर झडप,सुदैवाने जीव वाचला..!

bol maharashtra

भानसरा प्रा.शाळा व्यवस्थापन समितीच्या अद्यक्षपदि निलेश पावसे…!

bol maharashtra