Bol Maharashtra
सामाजिक

बाबुराव शेडमाके जयंती निमित्त वाघापूर येथे आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर

बाबुराव शेडमाके जयंती निमित्त वाघापूर येथे आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर

यवतमाळ-
क्रांतीवीर बाबुराव शेडमाके उत्सव समिती वाघापूर च्या वतीने क्रांतीवीर शहिद बाबुराव शेडमाके यांच्या १९३ व्या जयंती निमित्त दि. ११ मार्चला आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर कार्यक्रम उत्साहाने पार पडला.
यावेळी उदघाटन म्हणून आरोग्य समिती सभापती न. प. यवतमाळ च्या लताताई ठोंबरे तर अध्यक्षस्थानी डॉ बाबासाहेब येलके औषध शास्त्र प्रमुख हे होते.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ मधुकरराव मडावी डॉ. शीतल मडावी, डॉ. तुषार खडसे,डॉ.अमोल वट्टी, डॉ. उमेश मडावी, डॉ.दिपक नैताम,डॉ हर्षल येरकाडे, डॉ चित्रलेखा आकाश कुडमेथे,डॉ विशाखा गेडाम, डॉ आकाश कुडमेथे,गुलाबराव कुडमेथे,प्रल्हादराव सिडाम,राजु चांदेकर, गुलाबराव मेश्राम होते.
यावेळी नेत्र तपासणी, दंत तपासणी, बालरोग तपासणी, रक्त तपासणी, शुगर व बिपी तपासणी व ई. सी. जी.करण्यात आली. तसेच रक्तदान करण्यात आले.
सुत्रसंचालन राहूल मेश्राम व आभार ज्योतीताई मडावी यांनी केले.
कार्यक्रम परिश्रम साठी क्रांतीवीर बाबुराव शेडमाके उत्सव समिती मुख्य प्रवर्तक नरेश उईके, अध्यक्ष पवनकुमार आतराम, विनोद मडावी,कृष्णा पुसनाके, दिलीप शेडमाके, निकीता उईके, किशोर उईके, अजय उईके, विजय पेंदाम, गुलाब घोडाम,विनोद उईके,शंकर कोटनाके, उमेश मेश्राम,कशीश उईके,स्वप्निल तोडासे,नंदकिशोर आडे,स्वरुप टेकाम,गजानन उईके यांनी केले.
असे प्रसिद्ध प्रमुख कृष्णा पुसनाके व भरत गेडाम यांनी कळवले आहे.           

Related posts

स्व.अजित दादांना आर्णीत श्रद्धांजली, परवेज बेग मित्र परिवारा कडून श्रद्धांजली सभेचे आयोजन..!

bol maharashtra

बंजारा समाजाची संस्कृती,विरासत जपण्यासाठी संजय राठोड यांनी केलेले परिश्रम उल्लेखनीय…!

bol maharashtra

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची देवराव पाटील शिंदे कॉलेज कडून पथनाट्या द्वारे जनजागृती

bol maharashtra