Bol Maharashtra
राजकारण सामाजिक

स्व.अजित दादांना आर्णीत श्रद्धांजली, परवेज बेग मित्र परिवारा कडून श्रद्धांजली सभेचे आयोजन..!

सतत सामाजिक कार्यात मग्न राहणारे आर्णी चे सामाजिक युवा कार्यकर्ते व पत्रकार परवेज बेग यांनी पुढाकार घेऊन राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजित दादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एका श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले

 : येथील अंजली ड्रेसेस च्या हॉलमध्ये स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात आलेली शोकसभा आज अत्यंत भावनिक वातावरणात संपन्न झाली. परवेज बेग मित्र परिवार यांच्या वतीने या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या शोकसभेस शहरातील राजकीय, सामाजिक, व्यापारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये राजेश श्रीवास, संतोष श्रीवास, आबीद फानन, बबलू जाधव, ॲड. जावेद शेख, ॲड. राहुल ढोरे, राहुल पोडूटवार, साबीर शेख, जानी सोलंकी, इंजि. इमरान सय्यद, पूजा ढाले, बबीता शिवणकर, शुभम डोल्हारकर, सुलेमान फाजलानी, शेख साबीर, संजू गावंडे, मो. शाकीर, अरबाज मिर्झा, राजु मलनस, सोहेल चव्हाण, महेंद्र ढाले आदी मान्यवरांचा समावेश होता.
उपस्थित मान्यवरांनी स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याची आठवण करून देत त्यांच्या नेतृत्वगुणांबद्दल आणि सामाजिक योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण करून आपल्या भावना व्यक्त केल्या.
या दुःखद प्रसंगी उपस्थित राहून सांत्वन करणाऱ्या तसेच श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या सर्व हितचिंतकांचे परवेज बेग मित्र परिवार यांनी मनःपूर्वक आभार मानले.

 

Related posts

पंचायत समिती सदस्यांना विधानपरिषदेत मतदानाचा हक्क व विकास निधी द्यावा:विजयसिंह राठोड

bol maharashtra

शिक्रापूर(पुणे): अजिंक्यतारा इंग्लिश स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन…!

bol maharashtra

देशाला सत्पुरुषांची गरज आहे ते शाळेमधून घडले पाहीजे… नगराध्यक्ष नालंदा भरणे…

bol maharashtra