Bol Maharashtra
निवडणूक राजकारण सामाजिक

सीमा त्रिनयन कळमकर जिल्हा परिषदेच्या आखाड्यात. वाढता प्रतिसाद..!

प्रतिनिधि 🖊️संदिप ढाकुलकर

सीमा त्रिनयन कळमकर जिल्हा परिषदेच्या आखाड्यात..!

शिक्रापूर (पुणे) जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत शिक्रापूर ,कोरेगाव भीमा,वाडा पुनर्वसन गटात मा .ग्रामपंचायत उपसरपंच त्रिनयन कळमकर यांच्या पत्नी सीमा कळमकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांना भाजपने पाठिंबा दिला आहे.नुकत्याच झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत कळमकर यांनी उपसरपंचपदाची निवडणूक लढवत चार मतांनी विजय मिळवला होता.खात्रीलायक सूत्राच्या माहितीनुसार शिक्रापूर ग्रामपंचायतीचा कालावधी अवघा एक महिना राहिला आल्यामुळे पुढील सभासदाला संधी मिळण्यासाठीआपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.एकंदरीत या पाच वर्षात ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांचे काम नेहमीच उल्लेखनीय राहिले आहे आणि त्यांचा जनसंपर्क सुद्धा दांडगा आहे याच कामाच्या जोरावर त्यांनी आपली पत्नी सौ सीमा कळमकर यांना जिल्हा परिषदेच्या आखाड्यात उतरविले आहे. या गटातील सुज्ञ मतदार नेमके कोणाचे पारडे जड करील हे येत्या नऊ तारखेला स्पष्ट होईल

Related posts

यवतमाळ येथे पोलीस भरती मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन.

bol maharashtra

आर्णीत धडकनार एम आय एम चे वादळ,राजकीय समीकरणात होणार मोठे बदल,युसूफ पुंजानी यांचा दौरा..!

bol maharashtra

श्रीनिवास मंगनाळे यांची शिवसेना तालुका समन्वयकपदी नियुक्ती

bol maharashtra