Bol Maharashtra
Last 24 Hour राजकारण सामाजिक

आर्णीत धडकनार एम आय एम चे वादळ,राजकीय समीकरणात होणार मोठे बदल,युसूफ पुंजानी यांचा दौरा..!

महापालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्या नंतर ए एम आय एम  पक्षांव आता राज्य भर संघटन व पक्ष वाढीवर भर दिल्याचे दिसत असून आर्णी शहरात देखील मोठा राजकीय भूकंप होण्याचे चिन्ह दिसत आहेत.

त्या दृष्टीने एम आय एम चे राज्य उपाध्यक्ष युसूफ सेठ पुंजानी हे आर्णी दौऱ्यावर येत आहेत.

 

AIMIM चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हाजी युसुफ सेठ पुंजानी यांचा उद्या आर्णी दौरा

आर्णी शहराच्या राजकीय वातावरणात मोठी हालचाल पाहायला मिळणार असून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलिमिन (AIMIM) पक्षाची शहरात जोरदार एंट्री होण्याची चिन्हे दिसत आहेत. शहरातील विविध पक्षांचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी प्रदेश अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रमुख उपस्थितीत AIMIM मध्ये पक्षप्रवेश करण्याच्या तयारीत असून, लवकरच याबाबत तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. या करिता आढावा घेण्यासाठी दिनांक ८ फेब्रुवारी रोज रविवारला AIMIM चे प्रदेश उपाध्यक्ष हाजी युसूफसेठ पुंजानी यांचेसह जिल्हाध्यक्ष सय्यद इरफान, सलीमजी सांगवान, युवा जिल्हाध्यक्ष अंजुमलाला सह अनेक पदाधिकारी आर्णी दौऱ्यावर येणार असून, सर्वधर्मीय सलोख्याचे प्रतीक असलेल्या बाबा कंबलपोष दर्गा येथे ते दर्शन घेणार आहेत.
दर्शनानंतर ते आर्णी शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी यांच्या घरी भेटी देणार असून, आगामी पक्षप्रवेश कार्यक्रमाची तारीख निश्चित करण्यात येणार आहे. या पक्षप्रवेशामुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2022 पासून स्थानिक MIM पदाधिकारी यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ म्हणून स्थानिक राजकारणात AIMIM ला आता बळ मिळणार आहे. आगामी काळात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

Related posts

परसोडा ग्राम पंचायत द्वारा मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

bol maharashtra

भाजप उमेदवार पंडा गायकवाड यांनी फोडला प्रचाराचा नारळ,उस्फुर्त प्रतिसाद,ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरातून श्री गणेशा..!

bol maharashtra

तपोवनाच्या वृक्षांना हरित लवादा ची ढाल..!

bol maharashtra