Bol Maharashtra
निवडणूक राजकारण

भाजप उमेदवार पंडा गायकवाड यांनी फोडला प्रचाराचा नारळ,उस्फुर्त प्रतिसाद,ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरातून श्री गणेशा..!

प्रतिनिधि ✒️संदीप ढाकुलकर

ग्राम दैवत भैरवनाथ मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून भाजप उमेदवार पंडा भाऊ गायकवाड यांच्या प्रचारास सुरुवात..!

शिक्रापूर (पुणे) महाराष्ट्र राज्याचे कैलासवासी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर तीन दिवस शासकीय दुखवटा असल्यामुळे प्रचाराच्या तोफा थंडावल्या होत्या आज तीन दिवसानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला पंचायत समिती शिक्रापूर कासारी राऊतवाडी गणाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार पंडा भाऊ गायकवाड यांनी शिक्रापूरचे ग्रामदैवत असलेले भैरवनाथ मंदिर येथे असंख्य कार्यकर्त्यांसह प्रचाराचा नारळ फोडून प्रचारास सुरुवात केली यावेळेस अनेक मान्यवरांनी भाषणे केली त्यात उमेदवारी अर्ज भरून अर्ज माघारी घेणारे उमेदवार ग्रामपंचायत सदस्य निलेश थोरात, मा. उपसरपंच सौ पूजाताई भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य मयूर करंजे आदींनी पांडा भाऊ गायकवाड यांना बिनशर्त पाठिंबा दिला यावेळेस बोलताना माजी उपसरपंच सौ पूजाताई भुजबळ यांनी ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे आणि ही लढाई सर्वसामान्य माणसाची आहे असेच समजून उमेदवार पंडा भाऊ गायकवाड यांना नुसता प्रचार नाहीतर निवडून आणण्याचे आवाहन केले आहे याप्रसंगी शिक्रापूर नगरीचे माजी सरपंच बापूसाहेब जकाते, आबासाहेब करंजे, समता परिषदेचे सोमनाथ भुजबळ, उद्योजक दीपक भुजबळ, उद्योजक सागर सायकर, उद्योजक विक्रम भुजबळ,माजी सरपंच रमेश भुजबळ मा .उपसरपंच सुजाता खैरे, मा. उपसरपंच कासारी अशोक फुलावरे, बबन भुजबळ, गुलाब नरके, विष्णू नरके, पंढरीनाथ नाना राऊत, अनिल राऊत, सुनील भूमकर, अनिल नवले, माजी उपसरपंच विशाल खरपुडे, चंद्रशेखर नरवडे, गोरक्ष कुंभार, प्रकाश सोंडे, पल्लवी हिरवे, रमेश खरपुडे, किरण गायकवाड, शिक्रापूर नगरीचे माजी सरपंच संजय जगताप, दैनिक सामन्याचे पत्रकार राजाराम गायकवाड, युवा उद्योजक आसिफ भाई, आदि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळेस प्रास्ताविक श्री अनिल नवले यांनी केले सूत्रसंचालन विशाल गायकवाड यांनी केले आणि सर्व ग्रामस्थांचे आभार अतुल ताजणे यांनी केले. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना दोन मिनिट मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करत कार्यक्रमास सुरुवात केली. यावेळेस सर्वसामान्य जनतेचे उमेदवार श्री पंडा भाऊ गायकवाड यांना शिक्रापूर आणि परिसरातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता शिक्रापूर आणि परिसरातील नागरिक कोणाच्या झोळीत मताचे दान टाकणार हे चित्र येत्या नऊ तारखेला स्पष्ट होईल. या अटी तटीच्या लढाईत नेमकी धनशक्ती की जनशक्ती या पैकी कोणाचा विजय होईल ही जनता जनार्दनच ठरवणार आहे

Related posts

महामार्ग अधिकाऱ्यांच्या हस्ते ‘अघोरी पूजेचे’ घाट  (हिवरा संगमच्या तरुणाचे चक्क अनिसला पत्र ) 

bol maharashtra

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन रुपाली चा वाद एकीला भोवला..!

bol maharashtra

नगरसेवक डॉ.नीरज वाघमारे यांनी सामाजिक जाणिव जपत केले स्वखर्चाने कचरा कुंडी चे वाटप…!

bol maharashtra