Bol Maharashtra
राजकारण सामाजिक

नगरसेवक डॉ.नीरज वाघमारे यांनी सामाजिक जाणिव जपत केले स्वखर्चाने कचरा कुंडी चे वाटप…!

नगरसेवक कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे यवतमाळ पालिकेतील वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा अद्यक्ष व नग्रेसवक डॉ.नीरज वाघमारे .

आपल्या प्रभागात स्वछता ठेवण्याचा उदात्त हेतु ठेयन सामाजिक संवेदना जपणाऱ्या नगरसेवक डॉ.नीरज वाघमारे यांनी स्व खर्चातून कचरा कुंड्या वाटप केल्या त्यामुळे प्रभागातील मतदारांनी आनंद व्यक्त केला विशेष करून महिलांनी त्यांचे आभार मानले.

नगरपालिकेचे गटनेते डॉ.नीरज वाघमारे यांचा स्वच्छतेसाठी स्वखर्चातून पुढाकार; प्रभागात कचराकुंड्यांचे वितरण

यवतमाळ,दि.२२ फेब्रुवारी…
यवतमाळ नगरपालिकेचे गटनेते तथा नगरसेवक डॉ.नीरज वाघमारे यांनी प्रभाग क्रमांक १० मधील स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आज महत्त्वपूर्ण पुढाकार घेत स्वखर्चाने तयार केलेल्या कचराकुंड्यांचे विविध ठिकाणी वितरण केले.विशेष म्हणजे या कचराकुंड्यांचे वितरण आणि लोकार्पण साफसफाई कामगारांच्या हस्ते करण्यात आले.
प्रभागात कचराकुंड्यांची कमतरता असल्याने नागरिकांना कचरा टाकताना अडचणी येत होत्या.यासंदर्भात डॉ.वाघमारे यांनी यवतमाळ नगरपालिकेच्या टाऊन हॉलमध्ये पाहणी केली असता तेथे कचराकुंड्या उपलब्ध असल्याची माहिती मिळाली.त्यांनी तत्काळ नगरपालिका प्रशासनाकडे प्रभागासाठी कचराकुंड्या उपलब्ध करून देण्याची लेखी मागणी केली होती.मात्र प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी स्वखर्चाने ऑइल पेंटच्या टाक्या कापून मजबूत कचराकुंड्या तयार केल्या.
आज या कुंड्या प्रभागातील अनेक ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी बसविण्यात आल्या.यावेळी डॉ.वाघमारे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत सांगितले की,“आपला प्रभाग स्वच्छ ठेवण्यासाठी रोज जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या सफाई कामगारांचा आपण सन्मान केला पाहिजे.नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करून दिलेल्या कुंड्यांमध्येच टाकावा,जेणेकरून कामगारांना आरोग्याच्या समस्या निर्माण होणार नाहीत आणि परिसर स्वच्छ व सुंदर राहील.”
दरम्यान,वंचित बहुजन आघाडीच्या नेताजी नगर,दारव्हा रोड येथील जनसंपर्क कार्यालयावरही या कचराकुंड्यांचे लोकार्पण साफसफाई कामगारांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ.वाघमारे यांच्या या उपक्रमामुळे प्रभाग क्रमांक १० मध्ये स्वच्छतेबाबत जनजागृतीचा सकारात्मक संदेश पसरला असून नागरिकांकडून त्यांच्या कार्याचे स्वागत केले जात आहे.

 

Related posts

स्व.अजित दादांना आर्णीत श्रद्धांजली, परवेज बेग मित्र परिवारा कडून श्रद्धांजली सभेचे आयोजन..!

bol maharashtra

सीमा त्रिनयन कळमकर जिल्हा परिषदेच्या आखाड्यात. वाढता प्रतिसाद..!

bol maharashtra

बाजारपेठेच्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी ठोस उपायाची गरज!

bol maharashtra