Bol Maharashtra
राजकारण सामाजिक

आ. प्रा.राजू तोडसाम यांच्या वाढदिवसा निमित्ताने रोगनिदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद..७५२ रुग्णांची तपासणी…!

आर्णी केलापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रा.राजू तोडसाम यांचा वाढदिवस आर्णी येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला.

१२ फेब्रुवारी रोजी आर्णी येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात हजारो नागरिक विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या नंतर आर्णी ग्रामीण रुग्णालयात आमदार राजू भाऊ तोडसाम याची फळ तुला करण्यात आली व रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

त्या नंतर  त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने १३ फेब्रुवारी रोजी आर्णी येथील माहेर मंगल कार्यालय येथे भव्य रोगनिदान व उपचार शिबिर घेण्यात आले. या  मोफत शिबिराला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.

यावेळी तब्बल ७५२ रुग्णांनी लाभ घेतला. यातील २२६ रुग्णांना पुढील विशेष उपचारासाठी आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी मेघे येथे पाठविल्या जाणार आहे.

या शिबिराला आमदार प्रा.राजूभाऊ तोडसाम हे पत्नी प्रिया ताई शिंदे यांच्या सोबत उपस्थित होते. यावेळी त्यांचे स्वागत  व सत्कार पदाधिकारी मंडळींनी मोठा गुलाबाच्या हाराने केला.

या शिबिरात भाईतीय जनता पक्षाच्या सर्वांनी अतिशय काटेकोर नियोजन केले 

रुग्णांना नाव नोंदणी फाईल थैला देण्यात आला व सोबत पिण्याच्या पाण्याची व आसन व्यवस्था सुरेख केली होती.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश राठोड, निटताई राजेश आडे,,सहायक कामगार आयुक्त राजेश आडे,माजी तालुका अद्यक्ष किसन आडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनंत गावंडे पाटील,जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे  माजी अध्यक्ष विलास पाटील राऊत, वैद्यकीय आघाडी चे तालुका अध्यक्ष डॉ.शामसुंदर गुटे, डॉ.रमेश व्यवहारे,डॉ.सत्तरवार, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य विशाल देशमुख, मंगेश वानखडे, निखिल ब्राम्हणकर,गोपाल शर्मा, खेड चे सरपंच सचिन आडे, विनोद भाऊ,प्रा.सचिन गोफने बादल, कालबांडे, अमोल ठाकरे,लडके,उमेश राठोड, राम आगीरकर, विश्वजित मस्के कल्पजित देवकर,, शिवाजी भालेवाड, बादलू तीवारी,मंगेश सोयाम, राणा कुरसंगे,मोहन आगीरकर,सुनील पुसनाके, संजय राठोड वैभव कुडमते नगरपरिषद महिला व बालकल्याण सभापती सो.चैताली विशाल देशमुख व मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Related posts

शिवसेनेच्या अल्पसंख्याक विभागात खदीर लाटवाले यांची जळकोट शहर प्रमुखपदी नियुक्ती

bol maharashtra

पद नसतांना जनसेवेत तत्पर असणारा जनतेच्या मनातील नगरसेवक…!

bol maharashtra

ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत आर्णी पोलीस स्टेशन मधून क्रिकेट चा थरार…ए.पी.ए.चे आयोजन…

bol maharashtra