Bol Maharashtra
ब्रेकिंग मोठी बातमी सामाजिक

कामगारांच्या हितासाठी प्रेरणा संस्थेचे कार्य प्रशंसनीय कटिबद्ध:ना.संजय भाऊ राठोड

कामगार महोत्सव 2026 चे ना संजय राठोड यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

डॉ विष्णू उकंडे यांचा पुढाकार

आर्णी येथे प्रेरणा संस्था अंतर्गत कामगार व उद्योग समिती यवतमाळ जिल्हा यांच्या वतीने तथा डॉ विष्णू भाऊ उकंडे यांच्या पुढाकारातून भव्य कामगार महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन ना संजय राठोड पालकमंत्री तथा मृदा व जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ना राठोड यांनी कामगाराचे बचत गट करून त्यांचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे सांगितले.त्याच प्रमाणे डॉ विष्णू उकंडे यांनी आर्णी तालुक्यातील कामगार महिलांच्या उद्योग प्रशिक्षना करिता एक कोटीची मागणी केली असता
पालकमंत्री यांनी आर्णी येथे उद्योग प्रशिक्षण करिता अडीच कोटी रुपये देणार असल्याची घोषणा केली.
त्याचप्रमाणे एक भाऊ म्हणून कायम कामगार व उद्योग समितीच्या महिला भगिनीच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी प्रेरणा संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हस्तकला प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते,
त्याचप्रमाणे नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा व होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,
यावेळी अनेक भगिनींनी अप्रतिम नृत्य व गायन सादर केले.
तसेच सहाय्यक आयुक्त कौशल्य विभाग यवतमाळ सुशील उचले यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी राजुदास जाधव.राजेंद्र जाधव तहसीलदार वैशाख वाहूरवाघ,आर्णी नगरपरिषद उप नगराध्यक्ष निलेश गावंडे सभापती छबूताई चारोडे नगरसेवक पवन चाफले ,विशाल मनवर माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ रुक्मिणी उकंडे
अश्विनी देशमुख संध्या मुनेश्वर कविता चव्हाण कविता मोरे
अभिलाष इंगोले तथा इतर मान्यवर उपस्थित होते,
यावेळी संचलन आर्शीया सैय्यद यांनी केले तर आभार संजय चव्हाण यांनी मानले

Related posts

आर्णीत इतिहास घडणार, भक्तांच्या गर्दी चा रेकॉर्ड होणार…!

bol maharashtra

महाशिवरात्री निमित्य हायर कंपनीच्या मित्र परिवारातर्फे फराळाचे वाटप.!

bol maharashtra

संदीप ढाकुलकर यांची राज्य मराठी पत्रकार परिषद शिरूर ता . सचिव पदी निवड

bol maharashtra