Bol Maharashtra
बिना केटेगरी ब्रेकिंग मोठी बातमी सामाजिक

संदीप ढाकुलकर यांची राज्य मराठी पत्रकार परिषद शिरूर ता . सचिव पदी निवड

संदीप ढाकुलकर यांची राज्य मराठी पत्रकार परिषद शिरूर ता . सचिव पदी निवड

शिरूर जि.पुणे (प्रतिनिधी)

राज्य मराठी पत्रकार परिषद पश्चिम महाराष्ट्र अंतर्गत पुणे विभागीय जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन शिरूर तालुका कार्यकारणी निवडीसाठी श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथे रविवार दिनांक (१४ डिसेंबर) रोजी करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य मराठी पत्रकार परिषद पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पत्रकार विजयराव ज्ञानेश्वर लोखंडे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून पुणे जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार विजय अशोक थोरात उपस्थित होते.

यावेळी झालेल्या पत्रकारांच्या बैठकीत शिरूर तालुका अध्यक्ष एकनाथ थोरात यांची पुणे जिल्हा संपर्कप्रमुखपदी निवड करण्यात आली. तसेच शिरूर तालुका अध्यक्षपदी आकाश वडघुले, तालुका उपाध्यक्षपदी शुभम वाकचौरे व सुधीर खोमणे, शिरूर शहर प्रमुखपदी प्रदीप रासकर, उप शहर प्रमुखपदी बाळासाहेब जाधव, खजिनदारपदी दत्तात्रय जायकर, सचिवपदी बोल महाराष्ट्राचे प्रतिनिधि संदीप ढाकुलकर, संपर्कप्रमुखपदी गणेश सिनलकर तर संघटकपदी राहुल पाचर्णे यांची निवड करण्यात आली. यासह अनेक पत्रकार सदस्यांची विविध पदांवर निवड करण्यात आली.

या बैठकीस तालुक्यातील ज्येष्ठ व युवा पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून केंद्रीय संस्थापक अध्यक्ष मधुसुधन पाटील साहेब, विभागीय अध्यक्ष नितीन करडे,पुणे जिल्हाध्यक्ष हभप सचिन महाराज माथेफोड यांनी अभिनंदन केले असून पत्रकार क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना उपस्थितां मधून व्यक्त होत आहे

Related posts

आर्णी च्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून स्व.अजित दादांचे बारामतीत घेतले अंत्यदर्शन

bol maharashtra

परसोडा ग्रामपंचायत गाठत आहे,सामाजिक कार्याचा कळस,आदर्श उपक्रम राबवून देत आहे अनोखा संदेश…!

bol maharashtra

शहरासाठी तळमळीने झटलेला लोकसेवक भिकमचंद लोया…!

bol maharashtra