Bol Maharashtra
सामाजिक

परसोडा ग्रामपंचायत गाठत आहे,सामाजिक कार्याचा कळस,आदर्श उपक्रम राबवून देत आहे अनोखा संदेश…!

आर्णी तालुक्यातील परसोडा ग्रामपंचायत म्हणजे गाव कसे असावे याचे उत्तम उदाहरण ठरत आहे.

पंतप्रधान घरकुल योजना असो की शेतकरी वेगाच्या वयक्तिक लाभाच्या योजना असो की महिलांच्या नावाने मिळकत पत्रिका करणे ग्राम स्वच्छता अभियान आरोग्य शिबीर,धार्मिक सामाजिक प्रबोधन असो की मोफत दळण देणे असो विविध स्तरावर सन्मानित पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत म्हणून परसोडा ग्रामपंचायत ची ख्याती आहे.

शासणाच्या  विविध प्रकारच्या योजना गावकऱ्यांना मिळाव्या म्हणून येथील ग्रामपंचायत काम करते आहे यासाठी ग्रामपंचायत सरपंच, सचिव व ग्रामस्थ एकजुटीने काम करतात.त्यासाठी त्यांना पंचायत समिती आर्णी चे गटविकास अधिकारी रमेश खारोळे सर्व विस्तार अधिकारी मार्गदर्शन करत असतात.

परसोडा ग्राम पंचायत द्वारा ऍनेमिया मुक्त गाव प्रशिक्षण व मार्गदर्शन व तपासणी शिबिराचे आयोजन*
आर्णी :परसोडा ग्रामपंचायत वअस्मिता संस्था यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमानाने ऍनेमिया मुक्त गाव प्रशिक्षण,मार्गदर्शन व तपासणी शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत चे कार्यालयात करण्यात आले होते.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत परसोडा ग्रामपंचायत द्वारा सदर शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत चे कार्यालयात करण्यात आले होते ह्या शिबिराला अस्मिता संस्था यवतमाळ चे मास्टर ट्रेनर वैभव गायकी यांनी सखोल व उपयुक्त मार्गदर्शन केले.
ऍनेमिया व सेंद्रिय परसबाग ह्यांचे महत्व, पोषण आहार विषय माहिती, मायक्रो ग्रिन्स (सूक्ष्म भाज्या ) महत्व व सेंद्रिय परस बाग लागवड प्रक्रिया ह्या बाबत मार्गदर्शन करून आपण आपल्या सकस आहारावर लक्ष केंद्रित केले पाहिजे ज्यामुळे आपण ऍनेमिया सारख्या आजारा विरुद्ध लढा देता येईल. ह्याशिबिराला सरपंच प्रा सौं स्वप्ना अतुल देशमुख, उपसरपंच सौं सुनंदा विनोद पत्रे, मंगला हनुमंत चौधरी, आशा नारायण सोळंके, सारिका कोल्हे, राजश्री कोल्हे, स्वाती पत्रे, अस्विनी शेळके, मंदा कोल्हे, रुखमा आडे, कौसल्या राठोड, कमला राठोड, रत्नकला वाळले,इंदिरा सोळंके, कमला जुडे, नलू पारधी, चंदा जाधव, सविता जाधव, पुष्पा जाधव ह्यांनी मोलाचे सहकार्य केले तर अस्मिता संस्था यवतमाळ चे मास्टर ट्रेनर वैभव गायकी यांचा ह्यावेळी सत्कार सुद्धा करण्यात आला.

Related posts

वाढीव गृहकरामुळे जनतेत तीव्र असंतोष शेकडो तक्रारी दाखल; 29 डिसेंबरला सुनावणी

bol maharashtra

परसोडा स्मशानभूमीत श्री.महादेवाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापणा…!

bol maharashtra

लाडक्या बहिणीं’चा संताप कामी आला, ८६ लाख महिलांच्या अडकलेल्या हप्त्यांचा मार्ग मोकळा. सौ. राधाबाई कामारकर यांच्या मागणीला यश

bol maharashtra