प्रतिनिधि/संदिप ढाकुलकर
सौ. हिराबाई गोपाळराव गायकवाड माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न..!
शिक्रापूर ता.शिरूर कासारी येथील सौ. हिराबाई गोपाळराव गायकवाड माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आणि आर एम धारिवाल ज्युनिअर आणि सीनियर अकॅडमी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी MS-CIT केंद्राचे उद्घाटन, ग्रंथालय उद्घाटन आणि माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला.
जॉन डियर कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून गरीब गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप
सौ. हिराबाई गोपाळराव गायकवाड माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आणि आर एम धारिवाल ज्युनिअर अँड सीनियर अकॅडमी कासारी च्या माध्यमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये विद्यालयात भव्य संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन , ग्रंथालयाचे उद्घाटन तसेच जॉन डियर कंपनीच्या माध्यमातून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप तसेच माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला . कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून करण्यात आले . यावेळी सरस्वती मातेची प्रार्थना आणि इतनी शक्ती हमे देना दाता या प्रार्थनेचे गायन करण्यात आले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ पुणे रिव्हर साईड च्या अध्यक्षा श्रीमती प्रेरणा गायकवाड होत्या. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात संगणक ज्ञान आणि वाचन किती महत्त्वाचे आहे हे श्रीमती प्रेरणा गायकवाड यांनी नमूद केले तसेच विद्यालयातील संगणक प्रयोगशाळा आणि ग्रंथालय यांचा वापर विद्यार्थ्यांनी अधिकाधिक करावा आणि ज्ञान वृद्धींगत करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोलताना ड्युरो शोक्स कंपनीच्या डायरेक्टर श्रीमती निरुपमा गोयल यांनी आम्ही ग्रामीण भागामध्ये करत असलेल्या कामातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत सर्व प्रकारच्या सोयी सुविधा पोहोचाव्यात त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थी अधिकाधिक चांगल्या पद्धतीने शिक्षित होऊन सक्षमपणे आपली कुटुंबाची प्रगती करण्यात यशस्वी व्हावेत हाच उद्देश असल्याचे नमूद केले. विद्यालयामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व सुविधांचा विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वापर करून स्वतःचे ज्ञान समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे त्यांनी आवर्जून सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र कोरेकर यांनी विद्यालयाच्या सुरुवातीपासूनचा त्याचप्रमाणे समता शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र ढमढेरे यांनी ग्रामीण भागामध्ये हे विद्यालय सुरू करून ग्रामीण भागातील विशेषतः मुलींच्या शिक्षणाची केलेली सोय आणि त्या संदर्भात केलेले संघर्षमय कार्य कौतुकास्पद असल्याचे नमूद केले . विद्यालयातील इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कुमारी श्वेता लिंगे हिने सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दलची माहिती दिली . या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री. दत्तात्रय गिरमकर साहेब , श्री. सुनील महाजन साहेब , श्री. प्रवीण हासे साहेब , श्री. विजय पिळवटकर साहेब , श्रीमती राधिका दुबे, श्री. अतुल भोसले श्रीमती अनुराधा , श्री प्रवीण छाजेड श्री. विजय म्हसकर , श्री. अमित ब्राह्मणे , श्री. श्रीकांत राऊत , समता शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. रोहन ढमढेरे , शेतकी अधिकारी श्री. दिलीप कुरकुटे , संस्थेचे संचालक श्री. गुलाब सातपुते , श्री. दिलीप भुजबळ , श्री. तबन भुजबळ , श्री. संदीप रासकर , श्री. गणेश सातपुते , शिक्रापूरच्या ग्रामपंचायत सदस्य उषाताई राऊत , जॉन डीअर कंपनीचे ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या माध्यमातून श्री. स्वप्निल अंतरे सर , श्री. विवेकानंद बढे , सौ. नयना रासकर , सौ. नीताताई ढमढेरे , संगणक प्रशिक्षक श्री. ढवळे सर , विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. अरुण भुजबळ , सर्व प्राध्यापक , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , पालक आणि माजी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रावसाहेब थोरात यांनी केले तर श्री. विजय चव्हाण यांनी आभार मानले .
