Bol Maharashtra
सामाजिक

शिक्रापूर मध्ये कर्तव्य फाउंडेशन तर्फे 7500 भीम अनुयायांना अल्पोहार चहा व पाणी बॉटल वाटप..!

प्रतिनिधि/संदीप ढाकुलकर

शिक्रापूर मध्ये कर्तव्य फाउंडेशन तर्फे 7500 भीम अनुयायांना अल्पोहार चहा व पाणी बॉटल वाटप..!

शिक्रापूर तालुका शिरूर (पुणे) येथे 208 व्या शौर्यदिनानिमित्त कोरेगाव भीमा नजीकच्या विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी देशभरातून विविध राज्यांमधून आलेल्या लाखो अनुयायांच्या सेवेसाठी शिक्रापूर येथे सालाबाद प्रमाणे कर्तव्य फाउंडेशन यांच्यावतीने सुमारे साडेसात हजार अनुयायांना व्हेज पुलाव ,पाणी बॉटल व चहाचे वाटप करण्यात आले. सामाजिक दातृत्वाचा हा उपक्रम जनमानसात कौतुकाचा विषय ठरला आहे
विजय स्तंभाकडे जाणाऱ्या भीम अनुयायांचे शिक्रापूर येथे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले नववर्षाच्या पहिल्या दिवशी सामाजिक ऋणाची जाणीव ठेव फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ मनीषा रमेश गडदे आणि शिक्रापूरचे आदर्श सरपंच रमेश गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य सेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
शिरूर पंचायत समिती गटविकास अधिकारी महेशजी डोके साहेब,सहाय्यक गट विकास अधिकारी लहामटे साहेब विस्ताराधिकारी एस.के.शिंदे बी.आर.गावडे ग्रामपंचायत अधिकारी एस.व्ही शिंदे डी एन पलांडे,जिल्हाध्यक्ष ग्रामसेवक संघटना श्रीकांत वाव्हळ ,नंदकुमार वैद्य,संचालक गंगाधर देशमुख,शांताराम पाडळे,निलेश लोंढे,सुरेश साळवे,सौ.राणी कांबळे, सौ.रंजना वाघमारे,सौ.लता चितळकर ग्रामपंचायत कर्मचारी गणेश भुजबळ,ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर ,राहुल राजगुरू इत्यादी सर्व कर्मचारी पत्रकार उदयजी ब्राह्मणे महेश शिर्के अंकुश घारे सामना प्रतिनिधी राजाभाऊ गायकवाड आदर्श ग्रंथपाल संतोष काळे मोहम्मद भाई तांबोळी पत्रकार निलेश जगताप जितेंद्र काळोखे सौ.मेघा तांबे सौ.वैशाली गायकवाड सौ.वंदना रामगुडे इत्यादी कर्तव्य फौंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

“कर्तव्य फाउंडेशन च्या माध्यमातून आम्ही सातत्याने कार्य करत असतो त्याचाच एक भाग म्हणून लाखो भीम अनुयायांची सेवा करण्याची आणि समाजसेवेच्या कार्याची सुरुवात वर्षाच्या पहिल्या दिवसापासून होत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आणि आनंद आहे
अध्यक्षा सौ मनीषा गडदे कर्तव्य फाउंडेशन ,,

 

माणुसकी हाच श्रेष्ठ धर्म आहे हे समाज बांधवांची सेवा करणे हे आमचे कर्तव्य आहे विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या बांधवांची सेवा करण्याची संधी नववर्षाच्या सुरुवातीला मिळणे हे मी भाग्याचे समजतो.
आदर्श सरपंच रमेश गडदे शिक्रापूर यांनी असे मत या वेळी बोल महाराष्ट्र न्यूज सोबत बोलताना व्यक्त केले

Related posts

सुनील पोतगंटवार १६ वर्षा पासून करत आहेत जलसेवा,सामाजिक जाणिवेचे सर्वत्र कौतुक..!

bol maharashtra

कृष्णा पुसनाके,कॉम्रेड सचिन मनवर व प्रा.पंढरी पाठे यांनी दखल घेताच बोगस खवा-पेढा फॅक्टरी तात्काळ सील

bol maharashtra

शिक्रापूर (पुणे) केंदूर येथे विधवा महिलां साठी हळदी कुंकू कार्यक्रम घेऊन समाजात समोरअनोखा आदर्श..!

bol maharashtra