Bol Maharashtra
बिना केटेगरी

रांजणगाव येथे नोकरी च्या आमिषाने अनेक तरुणाची फसवणूक..!

प्रतिनिधि: संदीप ढाकुलकर (रांजणगांव पुणे)

रांजणगाव येथे नोकरी च्या आमिषाने अनेक तरुणाची फसवणूक..!

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहत येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे दुबई येथील नामांकित कंपनी मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवत अनेक तरुणाची प्रत्येकी १०हजार रुपये घेत फसवणूक केली आहे .तब्बल ६० तरुण तरुणींना डांबून ठेवले होते.या डांबून ठेवलेल्या तरुणांनी मदतीसाठी संपर्क केला असता शिवसेनेचे युवा जिल्हा प्रमुख बापूसाहेब शिंदे यांनी वेळीच पोलिस प्रशासनाला
माहिती दिली. त्यानंतर पोलिस प्रशासनाने कारवाई करत ज्या मधे ४३ तरुण आणि १७ तरुणीची सुटका करत या प्रकरणी कलीम अवद आणि ज्ञानेश्वर धाय धडक या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडून अजून किती जणांची फसवणूक केली आहे याची चौकशी सुरू आहे. नोकरीच्या निमित्ताने बेरोजगार तरुण इंस्टाग्राम आणि फेसबुक सारख्या सोशल मीडियाच्या व्हिडिओ वरील जाहिरातींना बळी पडत असून अशा फसव्या जाहिरातींना तरुणांनी बळी पडू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. या फसवणुकी प्रकरणी पुढील चौकशी पोलीस प्रशासनाकडून चालू आहे

Related posts

शेवटच्या क्षणा पर्यंत पक्षावर विश्वास ठेवला पण,जाकीर सोलंकी यांनी सोडली काँग्रेस ची साथ, शिवसेनेत घेतला प्रवेश..!

bol maharashtra

विधानसभा सामान्य निर्वाचन के मद्देनजर पुलिस और SSB की सयुंक्त टीम ने किया फ्लैग मार्च्

Web1Tech

हळव्यामनाचा दिलदार नेता गेला:माजी आमदार ख्वाजा बेग

bol maharashtra