Bol Maharashtra
गुन्हा बिना केटेगरी ब्रेकिंग मोठी बातमी सामाजिक

आर्णी तालुक्यातील शेंदूरसनी येथील जन्म मृत्यू नोंद,बिहार च्या दुबेला अटक,किरीट सोमय्या काय भूमिका घेणार…?

आर्णी तालुक्यातील शेंदूरसनी या लहान गावात लोकसंख्या असल्या पेक्षा दहा पट जन्म नोंदी आढळून आल्या होत्या.त्यामुळे आरोग्य विभागाने हा प्रकार लक्षात येताच यवतमाळ पोलिसात तक्रार दाखल केली होती.

घडलेल्या प्रकाराने एकच खळबळ उडाली होती. ही घटना माहीत पडताच भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या तातडीने आर्णी आले होते.देशात राहणाऱ्या अवैध बांग्लादेधी नागरिक यात असावेत असा संशय कदाचित किरीट सोमय्या यांना आला असावा.

आयते मटेरियल हाती लागल्या चा आनंद सोमय्या यांना जास्त दिवस घेता आला नाही.यवतमाळ पोलिसांनी मात्र या विषयात खोलात जात चौकशी केली आणि बिहार च्या २० वर्षीय तरुणास या प्रकरणात अटक करण्याची महत्वाची कामगिरी बजावली.

या प्रकरणी तपास करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी एक विशेष पथक नेमले या पथकाने थेट बिहार गाठत एकास अटक केली.आदर्श अशोक कुमार दुबे(रा.पंडित पूर जिल्हा सारण बिहार)असे त्याचे नाव असून यात अनेकांचा सहभाग असल्याचा संशय यवतमाळ पोलिसांना आहे.

जिल्हा जन्म मृत्यू नोंदणी निबंधकसुभाष शहाजी ढोले यांनी या प्रकरणात १६ डिसेंम्बर २०२५ fफिर्याद दाखल केली होती. यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ पोलीस पथकाने ही कामगिरी बजावली आता या प्रकरणात माजी खासदार किरीट सोमय्या काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Related posts

पाण्याचे महत्व जाणून एकोप्याने परसोडा ग्रामपंचायत ने बांधला ‘वनराई’ बंधारा…!

bol maharashtra

दिन दुबळ्या च्या सेवेत च खरा देव:रामराव पाटील राऊत..!

bol maharashtra

दरगाह ट्रस्ट चा तो उपक्रम ठरत आहेबाबांच्याआशीर्वादाची ऊब देणारा

bol maharashtra