Bol Maharashtra
गुन्हा

विजेचा लपंडाव, चोरांचा सुळसुळाट..!

वार्ताहर ✒️ संदीप ढाकुलकर

“विजेच्या लपंडावा अभावी रात्री भुरट्या चोराचा सुळसुळाट,,

शिक्रापूर ( शिरूर तालुका) येथे सध्या विजेचा लपंडाव सुरू आहे रात्री च्या वेळी सुद्धा अचानक विज जाण्याचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढले आहे याच संधीचा फायदा भुरटे चोर घेत आहे , सोमवारी रात्री मलटन फाटा परिसरात नागरिकाच्या सतर्कतेमुळे भुरट्या चोराचा चोरीचा डाव उधळून लावला आहे. या घटनेची माहिती घेण्यासाठी स्थानीक नागरिकांना संपर्क केला असता सोमवारी रात्री 3 वाजेच्या सुमारास रात्री रस्त्या वर मलटन फाटा येथिल कॉलनीत काही तरी संशया स्पद हालचाल होत असल्याची चाहूल लागताच नागरिकांनी आवाज दिला असता चोरांनी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले, या घटने मुळे कॉलनीतील रहिवास्या मध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. अशा चोरीच्या घटना न घडू या साठी स्थनिक पोलिस प्रशासनाने रात्रीच्या वेळी गस्त घालावी आणि महावितरण ने सुध्धा किमान रात्रीच्या वेळी विज पुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे

Related posts

तलवारींसह दोन गट आमनेसामने; पांढरकवडा पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

bol maharashtra

कोरेगावच्या भीमापत्रात उडी घेऊन महिलेची आत्महत्या ; आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट नाही..!

bol maharashtra

अखेर अनवर पठाण यांची तक्रार खरी ठरली,एम डी ड्रॅग चा पर्दाफाश…!

bol maharashtra