**पांढरकवडा / प्रतिनिधी**
दि. **०९/०६/२०२६** रोजी दुपारी **०४:३०** वाजण्याच्या सुमारास पांढरकवडा पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झाली की, ताडउमरी गावाजवळ दोन गटांतील काही युवक तलवारी व लाठ्यांसह एकमेकांना जीवाने ठार मारण्याच्या उद्देशाने आमनेसामने आले आहेत. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक **एल. डी. तावरे**, ठाणेदार, पांढरकवडा यांनी तात्काळ पोलीस पथक घटनास्थळी रवाना केले.
पोलीस पथक घटनास्थळी दाखल होताच परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. दोन्ही गटांतील युवकांना ताब्यात घेऊन संभाव्य मोठा अनर्थ टाळण्यात पोलिसांना यश आले.
या प्रकरणी फिर्यादी **आकीब बेग ऐहफाज बेग मिर्झा** (वय २८, रा. मोमीनाबाद कॉलनी, पांढरकवडा) यांच्या फिर्यादीवरून आरोपी **करण संजय शिंदे** (वय ३२, रा. ताडउमरी, ता. केळापूर) व त्याचे साथीदार **सुजित मोक्षवीर वानखेडे** (वय २७), **शेख समीर शेख चाँद** (वय २५), **पार्थ पंकज शेटे** (वय २१), **आशिष माणिक बेहेरे** (वय २१), **साईराम सुखदेव आगरकर** (वय १९) व **कौस्तुभ कृष्णराज कोवे** (वय १७) यांच्याविरुद्ध पांढरकवडा पोलीस ठाण्यात अप. क्र. **७८७/२६** अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तसेच फिर्यादी **सुजित मोक्षवीर वानखेडे** (वय २७, रा. लटारे ले-आऊट, पांढरकवडा) यांच्या फिर्यादीवरून आरोपी **आकीब ऐहफाज मिर्झा** (वय २८), **नाझीम ऐहफाज मिर्झा** (वय २८), **चिरंजीव रामदास लेंगुरे** (वय २३), **सैयद अदनाम अली** (वय २४) व **अनुप राजू कनाके** (वय २०) यांच्याविरुद्ध अप. क्र. **७८८/२६** अन्वये गुन्हा नोंदवून त्यांनाही अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, आरोपी **करण संजय शिंदे** व **सुजित मोक्षवीर वानखेडे** यांना पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांच्या आदेशानुसार कलम **५५ महाराष्ट्र पोलीस कायदा** अंतर्गत तडीपार करण्यात आले होते. मात्र, तडीपारी आदेशाचे उल्लंघन करून ते यवतमाळ जिल्ह्यात येऊन सार्वजनिक शांतता भंग करताना आढळल्याने त्यांच्याविरुद्ध अप. क्र. **७८९/२६** अन्वये स्वतंत्र कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी **दोन तलवारी, एक लोखंडी रॉड, पाच लाकडी काठ्या व चार मोटारसायकली असा एकूण २ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त** केला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक **कुमार चिंता**, अपर पोलीस अधीक्षक **अशोक थोरात** तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी **रॉबीन बन्सल** यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक **एल. डी. तावरे**, पोलीस उपनिरीक्षक **नितीन सुशीर**, पोहेकॉ. **विलास जाधव**, **रजनीकांत पाटील**, नापोकॉ. **सुनिल राठोड**, **सचिन काकडे**, पोकॉ. **राजू मुत्तलवार**, **विशाल वाढई** व **विजय राठोड** यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. **संदीप नरसाळे** व सपोनि. **सागर पेंढारकर**, पांढरकवडा पोलीस स्टेशन करीत आहेत.
