Bol Maharashtra
गुन्हा

आर्णी पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला…!

पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला.

अवैद्य शस्त्र बाळगुन आर्णी परिसरात वावरणा-या रेकार्डवरील
गून्हेगाराकडुन तलवार जप्त

दिनांक १३/१२/२०२५ रोजी गोपनीय बातमीदाराकडून माहीती मीळाली की, श्रीरामपुर पुसद येथील रेकार्ड वरील गुन्हेगार गजानन शंकर काळे हा काहीतरी घातपात करण्याचे उद्देशाने बुटले पेट्रोल परिसरात फिरत आहे. मीळालेल्या माहीतीवरून आर्णी पोलीसांनी बुटले पेट्रोलपंप परिसरात दोन पंचासह जावून पाहणी केली असता ईसम नामे गजानन शंकर काळे वय २३ वर्षे रा. श्रीरामपुर पूसद हा त्याचे हातात एक पिवळया रंगाचे पोते घेवून मीळाला. त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचेजवळील पोत्यामध्ये लाकडी मॅनामध्ये स्टिलच्या धातूची एक तलवार ज्याची लांबी ३३ ईच असलेली किंमत ५००० रू ची अवैद्यरित्या मीळून आली ती पोलीसांनी जप्त केली व पोलीस स्टेशन आर्णी येथे अप क्र.९९८/२०२५ कलम ४/ २५आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही आर्णी पोलीस निरीक्षक नीलेश सुरडकर यांचे मार्गदर्शनात पोलिस अधिक्षक श्री कूमार चिंता साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री अशोक थोरात साहेब तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा डॉ. सिध्देश्वर भोरे साहेब यांचे मार्गदर्शनात, निलेश सुरडकर पोलीस निरीक्षक आर्णी,सपोनि मिलींद पारडकर पोहवा गुनवंत बोईनवाड, पोहवा नितीन वास्टर पोहवा मनोज चव्हाण, पोकॉ / आकाश गावंडे पोकॉ / आशिफ खल्लीखाउ चालक पोहवा योगेश गीरी यांनी केलेली आहे.

Related posts

देश में कोरोना ने पकड़ी रफ्तार,कल की तुलना में आए आज ज्यादा नए मामले।

Web1Tech

बांग्लादेशात हिंदू नरसंहार,सकल हिंदू आर्णी च्या रस्त्यावर…!

bol maharashtra

कोरेगावच्या भीमापत्रात उडी घेऊन महिलेची आत्महत्या ; आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट नाही..!

bol maharashtra