Bol Maharashtra
गुन्हा

कोरेगावच्या भीमापत्रात उडी घेऊन महिलेची आत्महत्या ; आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट नाही..!

प्रतिनिधी संदिप ढाकुलकर

कोरेगावच्या भीमापत्रात उडी घेऊन महिलेची आत्महत्या ; आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट नाही..!

कोरेगाव भीमा येथील नदीच्या पात्रात महिलेने उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे मिळालेल्या माहितीनुसार सदरची तक्रार नामे मारुती रामदास पांचाळ वय अंदाजे ३७ वर्षे हल्ली राहणार वल्लभ नगर मलठण फाटा शिक्रापूर मूळ गाव भोकर तालुका भोकर जिल्हा नांदेड यांनी मृत महिलेचे नाव अनिता मारुती पांचाळ वय अंदाजे २५ वर्ष ही महिला कोणाला ही न सांगता दिनांक १५/२/२६ रोजी घरातून निघून गेली होती त्यामुळे पांचाळ यांनी पोलिस स्टेशन येथे धाव घेत पत्नी हरविल्याची तक्रार दिली होती या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी शोध घेतला असता सदर महिला कोरेगाव भीमाच्या हद्दीत भीमा नदी पात्रात मृत अवस्थेत आढळून आली रंग काळा सावळा गळ्यात मंगळसूत्र आणि उजव्या हातावर मारुती असे नाव नोंदलेले महिला आढळून आली असता स्थानिक नागरिकाच्या मदतीने शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपास करून उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले सदर महिलेला ५ वर्षे आणि मुलगा अंदाजे दीड वर्षे वयाचा असून सदर घटनां समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सदर महिलेचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय शिक्रापूर येथे असून पुढील तपास पोलिस अधिकारी श्रावण गुपचे करीत आहे मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही शवविचेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यू नेमका कशा मूळे झाला हे स्पष्ट होईल

Related posts

सहा महिने अनेकांना मूर्ख बनवणारी तोतया महिला आय ए एस..!

bol maharashtra

महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनो, आताच मोबाईलवर तपासा मेसेज; मिळेल खूष करणारी बातमी

Web1Tech

इजनी च्या मुख्याध्यापकाने केला भंगारावर हाथ साफ,पवन पाचकोरे यांनी केली तक्रार…!

bol maharashtra