Bol Maharashtra
क्रिकेट खेळ

खेळातून शिस्त व संघभावना विकसित व्हावी:आमदार प्रा.राजू तोडसाम…!

मैदानी खेळातून युवकां मध्ये शारीरिक व मानसिक दृढता येते व मैदानी ससामन्यातून संघ भावना व शिस्त विकसित होते असे प्रतिपादन आर्णी केलापूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार प्राध्यापक राजू भाऊ  तोडसाम यांनी व्यक्त केली.

जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतील ओपेरेन प्रस्थान अंतर्गत आर्णी पोलीस स्टेशन चे ठाणेदार निलेश सुरडकर व आर्णी पोलीस स्टेशन चे सर्व अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्याचे ( ए.पि. एल) आर्णी प्रीमियर लीग चे उद्घाटन आमदार राजु भाऊ तोडसाम यांच्या हस्ते करण्यात आले.तेव्हा उपस्थित मान्यवर व खेळाडू यांच्या सोबत ते संवाद साधत होते.

यावेळी आर्णी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर,अंजली ड्रेसेस चे संचालक राजेश श्रीवास सर्व  अधिकारी कर्मचारी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोठ्या उत्साहात आर्णी पोलिसांनी आयोजित सामान्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला .यावेळी जिल्हा पोलिस पाटील संघटनेचे माजी अद्यक्ष विलास पाटील राऊत माजी जिल्हा परिषद सदस्य अनंत पाटील गावंडे व भाजप कार्यकर्ते पदाधिकारी, खेळाडू उपस्थित होते.

 

Related posts

विधान सभा सामान्य निर्वाचन- 2022 को सकुशल सम्पन्न कराने हेतु थाना- शोहरतगढ़ व एसएसबी की संयुक्त टीम ने किया एरिया डोमिनेशन 

Web1Tech

चला खेळूया..बुद्धीबळ स्पर्धेत श्रावस्ती शेंद्रेची जिल्हास्तारावर निवड….

bol maharashtra

सौ. हिराबाई गोपाळराव गायकवाड माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न..!

bol maharashtra