Bol Maharashtra
खेळ सामाजिक

आर्णी पोलिसांनी जपली वर्दीतली माणुसकी…ठाणेदार निलेश सुरडकर यांनी वृद्धाश्रमास दिली ४० हजारा ची मदत…!

यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत विविध सामाजिक क्रीडा विषयक व आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा व मदत सहकार्य करण्याच्या दृष्टीने ऑपरेशन प्रस्थान राबविले.

या अंतर्गत तरुणांना क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी तालुका पातळी व जिल्हा स्तरावर विविध खेळाचे आयोजन करण्याच्या सूचना स्थानिक पातळीवर पोलिसांना दिल्या होत्या.

आर्णी पोलिसांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली आर्णी येथे ए पी एल म्हणजे आर्णी प्रीमिअर लीग  क्रिकेट चे सामने आयोजित केले होते.

या सामन्यांचे उद्घाटन आमदार राजू भाऊ तोडसाम यांनी केले होते.

सामने अतिशय उत्साही व वातावरणात पार पडले या सामान्य करिता प्रवेश शुल्क होते त्यातून पोलिसांना १,६०००० रुपये जमा झाले. त्यातून मैदान मंडप साउंड व इतर असे १,२००० रुपये खर्च झाले व शिल्लक ४० हजार रूपये राहिले

ही रक्कम आर्णी येथील स्व.सुशीला बाई नागापुरे वृद्धाश्रमास देण्याचे ठाणेदार निलेश सुरडकर यांनी ठरवले

आर्णी पोलीस नेहमीच वृद्धाश्रमला मदत करत असतात यावेळी देखील धान्य स्वरूपात मदत देण्याचे मनी असतांना स्व.सुशिलाबाई नागापूरे  वृद्धाश्रम स्थलांतर केल्या जाणार असल्याचे वृद्धाश्रमा चे संचालक खुशाल नागापुरे यांनी सांगितले म्हणून त्यांना रोख स्वरूपात मदत देऊन आर्णी पोलिसांनी वर्दीतली माणुसकी जपत नवा आदर्श निर्माण केला.

मदत देते वेळी वृद्धाश्रम संचालक खुशाल नागापुरे ठाणेदार निलेश सुरडकर,

सहायक पोलीस निरीक्षक पारडकर , पोलीस उप निरीक्षक राठोड , पोलीस उप निरीक्षक देशमुख , पोलीस अंमलदार मनोज चव्हाण , बोईनवाड

संकुलवार ,रवी चव्हाण ,सुजीत जाधव , संदीप ढेंगे , शेळके , नितीन वास्टर , टाले आदी उपस्थित होते.

Related posts

यवतमाळ येथे पोलीस भरती मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन.

bol maharashtra

कष्टकरी माणसाचा आवाज बाबा आढाव निवर्तले…!

bol maharashtra

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला महसूल विभागाच्या मिशन उभारी ने दिली मायेची ऊब…!

bol maharashtra