Bol Maharashtra
सामाजिक

बंजारा समाजाच्या मागणीला मोठे यश,सरकारने स्थापन केली उच्च स्तरीय समिती…!

महाराष्ट्रात व देशात मोठ्या संख्येने असनाऱ्या बंजारा समाजाला वेग वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळा जात निहाय दर्जा आहे.

आदिम व संस्कृती जपत काबाड कस्ट करणारा भटका समाज मात्र राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गात असावा ही मागणी समाजाचे नेतृत्व व राज्याचे लोकप्रिय मृद व जलसंधारण मंत्री व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना.संजय भाऊ राठोड यांनी सरकार कडे सातत्याने लावून धरली. बंजारा समाज देखील एकजुटी ने लढला.

बंजारा समाजास देशात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रवर्गात आरक्षण आहे.

त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर वन नेशन वन कॅटेगिरी वन रिजर्व्हेशन ही मंगणी ना.संजय भाऊ राठोड यांनी जोरदार मांडली व सातत्याने अनुसूचित जमाती प्रवर्गात बंजारा समाजाचा समावेश व्हावा म्हणून राज्य पातळीवर सरकारच्या बैठका घेतल्या.

पोहरादेवी (पोहरागड) म्हणजे देशातील बंजारा समाजा ची काशी मानल्या जाते.

येथे देशातील लाखो बंजारा भाविक जगदंबा माता,सामकी आई,प्रभू श्रीराम, संत सेवालाल, संत रामराम बापू यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात. देशातील कोट्यवधी बंजारा समाज बांधवांना पोहरागड येथे सुविधा व्हाव्यात त्यांना बंजारा समाजाच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक बाबींचे दर्शन व्हावे म्हणून बंजारा विरासत व बंजारा नंगारा भवन उभे करण्यात त्यासाठी रसजय सरकार कडून ७५० कोटी रुपयांचा विकास आराखडा व त्यासाठी निधी आणण्यासाठी ना.संजय भाऊ राठोड यांनी अथक परिश्रम घेतले.

आता महाराष्ट्र राज्यातील बंजारा समाजाची मागणी आहे की समाजाला राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे.ही मागणी देखील ना.संजय भाऊ राठोड यांनी सरकार दरबारी सातत्याने  रेटून सतत पाठपुरावा केला.

अखेर ना .संजय राठोड यांनी केलेले परिश्रम बंजारा समाजाने एकजुटीने लढलेला लढा यशस्वी होताना दिसतो आहे

राज्य सरकारने बंजारा आरक्षण करिता उच्च न्यायालयाच्या सेवा निवृत्त न्यायाधीश यांचे आद्यक्षतेखाली एक उच्च स्तरीय समिती स्थापन केली असून त्यामुळे बंजारा समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आदिवासी विकास मंत्री प्रा.अशोक उईके व मृद व जलसंधारण मंत्री व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना.संजय भाऊ राठोड यांचे आभार मानले आहे.

Related posts

भानसरा प्रा.शाळा व्यवस्थापन समितीच्या अद्यक्षपदि निलेश पावसे…!

bol maharashtra

कृष्णा पुसनाके,कॉम्रेड सचिन मनवर व प्रा.पंढरी पाठे यांनी दखल घेताच बोगस खवा-पेढा फॅक्टरी तात्काळ सील

bol maharashtra

शिक्रापूर (कोयाळी ) गावठाण येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी ..!

bol maharashtra