Bol Maharashtra
आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळ

सामना जिंकला पाकिस्तान ने मात्र मन जिंकले श्रीलंका संघाने…!

तुमच्या विजया पेक्षा आमच्या पराभवाची चर्चा जास्त झाली असे राजकारणात म्हटले जाते .तसेच काहीसे टी ट्वेन्टी विश्वकप क्रिकेट स्पर्धेत पहायला मिळाले सुवर ८ मधील सामन्यात पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना अतीशय रंगतदार व चुरशीचा झाला.

या सामन्यात पाकिस्तान संघाने ५ धावांनी निसटता विजय मिळवला। तरीही या सामन्यात पाक समघाच्या विजया पेक्षा श्रीलंका संघाने दिलेली कडवी झुंज क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय ठरत आहे.

टी२०वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतून पाकिस्तानला गाशा गुंडाळावा लागला आहे. सुपर ६ फेरीत गट २ मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात शेवटचा सामना झाला. हा सामना पाकिस्तानने जिंकला पण नेट रनरेटचं गणित सोडवण्यात अपयश आलं. पाकिस्तानच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली होती. पाकिस्तानने या सामन्यात २० षटकात ६ गडी गमवून २१२ धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी २१३धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान गाठताना श्रीलंकेची सुरूवात काही चांगली झाली नाही. पण नंतर श्रीलंकेने डाव सावरला. श्रीलंकने २० षटकात ६ गडी गमवून २०७ धावांपर्यंत मजल मारली. हा सामना श्रीलंकेने फक्त ५ धावांनी गमावला. हा सामना श्रीलंकेने गमावला असला तरी न्यूझीलंडचं भलं करून गेले. कारण या सामन्यात पाकिस्तानला नेट रनरेटचं गणित काही सोडवता आलं नाही. त्यामुळे न्यूझीलंडला उपांत्य फेरीचं तिकीट मिळालं आहे.

 

Related posts

जगाला भगवान गौतम बुद्ध व भगवान महावीर यांच्या विचारांची गरज…!

bol maharashtra

लंकेच्या सिंहा समोर झिबोंबे च सिकंदर, शाही विजय…!

bol maharashtra

2022 में उत्तर प्रदेश का विधान सभा चुनाव सेमीफाइनल नहीं फाइनल है – अखिलेश सिंह यादव

Web1Tech