Bol Maharashtra
धर्म - कर्म सामाजिक

श्री कान्होबा महाराज देवस्थान, म्हसोला – अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा,राजू भाऊ विरखडे यांनी दिली भेट…

श्री कान्होबा महाराज देवस्थान, म्हसोला – अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा

म्हसोला येथील जागृत देवस्थान श्री कान्होबा महाराज मंदिर येथे सध्या अध्यात्मिक चैतन्याचा सोहळा सुरू आहे! मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात ‘श्रीमद् भागवत कथा’ आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आज या भक्ती सोहळ्याला पंचायत समितीचे माजी सभापती राजू भाऊ विरखडे यांनी भेट देऊन दर्शन घेतले त्यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला.. या निमित्ताने मंदिराच्या परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती संपूर्ण गाव भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले होते.

 

सुरुवात: यात्रेचा आणि भागवत कथेचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

समाप्ती: हा मंगलमय सोहळा आणि यात्रा दिनांक २८ तारखेला काल्याच्या कीर्तनाने आणि महाप्रसादाने संपन्न होईल.

गावातील ग्रामस्थ, तरुण मंडळी आणि भजनी मंडळाच्या वतीने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हा उत्सव साजरा केला जात आहे. सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.करण्यात आली आहे.

 

Related posts

हळव्यामनाचा दिलदार नेता गेला:माजी आमदार ख्वाजा बेग

bol maharashtra

केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे केवळ जाहिरातबाजी:कृष्णा पुसनाके,शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली

bol maharashtra

बाजारपेठेच्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी ठोस उपायाची गरज!

bol maharashtra