Bol Maharashtra
बिना केटेगरी मोठी बातमी राजकारण सामाजिक

हळव्यामनाचा दिलदार नेता गेला:माजी आमदार ख्वाजा बेग

माझ्या राजकारणाची सुरुवातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झाली

मी तेव्हा दिग्रस विधानसभा निवडणुकीत अल्प मताने पराजित झालो तेव्हा खा.शरद पवार साहेब व अजित दादांनी मला धीर देत काम करत राहण्यास प्रेरित केले.दादांनी मला एका कुटुंबातील सदस्यत्व असल्या प्रमाणे मार्गदर्शन केले.

अतिशय कर्तव्य कठोर शिस्तीचे  तेवढेच मनमिळाऊ दादा कायमस्वरूपी माझ्या राजकीय सामाजिक कारकिर्दीत पाठीशी खंबीरपणे उभे होते.

त्यांच्या निधनाचे वृत्त कळले तेव्हा मोठा धक्का बसला. सुरवातीला यावर विश्वास बसत नव्हता पण दुर्दैवाने ते खरे होते दादांच्या जाण्याने वयक्तिक माझे माझ्या कुटुंबाची राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराची व महाराष्ट्र राज्याची कधीच भरून निघणार नाही अशी हानी झाली या शब्दात विधान परिषद सदस्य माजी आमदार ख्वाजा बेग यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.

अजित दादा दूरदृष्टी चे नेतृत्व होते त्यांच्या असंख्य आठवणीने बेग गहिवरून गेले.विधान परिषदेत संधी देण्या पासून जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व देण्यात त्यांचा मोठा सिंहाचा वाटा असल्याचे बेग यांनी नमूद केले .

२१/८/२०१९ ला माजी आमदार ख्वाजा बेग यांच्या आर्णी येथील निवासस्थानी अजित दादांनी सदिच्छा भेट दिल्याची आठवण त्यांनी काढली यावेळी बेग यांचे डोळे पाणावले होते त्यांनी स्व.अजित दादा यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Related posts

जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा वाचवण्यासाठी अभिनव सुरवात करणारा अवलिया कवी विजय ढाले….!

bol maharashtra

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज ( पारवा येथे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा एल्गार)

bol maharashtra

नाम फाउंडेशनचा मायेचा हात; सिरेसायगावात गरजू महिला शेतकऱ्यांना बियाणे वाटप

bol maharashtra