Bol Maharashtra
मोठी बातमी

दादांची जागा कोणी घेऊ शकणार नाही, हा मोठा आघात,साजिद बेग भावूक..!

काल दिवसाची सुरुवात एका धक्कादायक बातमीने झाली उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले.त्यामुळे पवार कुटुंबीय व राज्यातील विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते व सामान्य माणूस भावनिक झालेले पहायला मिळत होते.

आर्णी येथील आर्णी नगरपरिषद चे नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस साजिद बेग हे अतिशय भावूक झाले त्यांनाही आपले अश्रू आवरता आले नाही.एक समर्थ नेतृत्व गेले.दादा केवळ पवार कुटुंबातील नव्हते तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवाराचे कुटुंब प्रमुख होते त्यांची पोकळी कधीच भरून निघणार नाही.यामुळे राज्याचे अपरिमित नुकसान झाले .

आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून दादा यांचे विचार पुढे नेऊ पवार कुटुंब व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व जे आदेश देतील त्या प्रमाणे आम्ही काम करू हे सांगताना साजिद बेग हे प्रचंड भावूक झाले.

Related posts

कामगारांच्या हितासाठी प्रेरणा संस्थेचे कार्य प्रशंसनीय कटिबद्ध:ना.संजय भाऊ राठोड

bol maharashtra

मा .जि .प . सदस्या कुसुम मांढरे यांची उमेदवारी अखेर मागे ..!

bol maharashtra

पुलिस अधीक्षक महोदय सिद्धार्थनगर द्वारा शुक्रवार की साप्ताहिक परेड का किया गया निरीक्षण

Web1Tech