Bol Maharashtra
सामाजिक

लेखी हमीनंतर गुरुदेव युवा संघाचे उपोषण मागे ३० जानेवारीपर्यंत चौकशी अहवाल देण्याचे विभागीय आयुक्तांचे आश्वासन जिल्हा प्रशासनाच्या मागे फटाके लागणार

लेखी हमीनंतर गुरुदेव युवा संघाचे उपोषण मागे

३० जानेवारीपर्यंत चौकशी अहवाल देण्याचे विभागीय आयुक्तांचे आश्वासन

जिल्हा प्रशासनाच्या मागे फटाके लागणार

यवतमाळ : गुरुदेव युवा संघाच्या वतीने गेल्या २५ जानेवारीपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण अखेर विभागीय आयुक्तांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे. गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या उपोषणाला यश मिळाले असून, प्रशासनाने चौकशी व उपाययोजनांबाबत लेखी हमी दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
विभागीय आयुक्तांनी दिलेल्या लेखी आश्वासनानुसार, येत्या ३० जानेवारीपर्यंत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर केला जाणार आहे. यासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, यवतमाळ नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी गेल्या सात महिन्यांपासून समिती का गठीत झाली नाही, याबाबतही ३० जानेवारीपर्यंत खुलासा करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.याशिवाय दिव्यांग, निराधार, पारधी समाज, आदिवासी समाज तसेच इतर वंचित घटकांच्या मूलभूत सुविधा, प्रश्न व योजनांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र विशेष समिती गठीत करण्यात येणार असल्याचेही लेखी पत्रात नमूद करण्यात आले आहे. या सर्व मागण्यांवर निश्चित कालमर्यादेत कार्यवाही करण्याची हमी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
विभागीय आयुक्तांकडून लेखी स्वरूपात अधिकृत पत्र प्राप्त झाल्यानंतर गुरुदेव युवा संघाने आपले बेमुदत उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, ३० जानेवारीपर्यंत न्याय मिळाला नाही किंवा आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही, तर पुन्हा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही संघाच्या वतीने देण्यात आला आहे.

सर्वसामान्यांचा विजय म्हणजे लोकशाहीचा विजय – गुरुदेव

गोरगरिबांचे, वंचितांचे आणि दुर्लक्षित घटकांचे प्रश्न सुटले नाहीत, तर रस्त्यावर उतरून लढा तीव्र केला जाईल, अशी ठाम भूमिका गुरुदेव युवा संघाने व्यक्त केली आहे. प्रशासनाने लेखी हमी दिल्याने हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले असले, तरी आंदोलनाची दिशा पुढील निर्णयांवर अवलंबून राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आमच्या आंदोलनाची प्रशासकीय दखल घेण्यात आली हा सर्वसामान्यांचा विजय लोकशाहीचा विजय आहे, असे गेडाम यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केले.

Related posts

जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा वाचवण्यासाठी अभिनव सुरवात करणारा अवलिया कवी विजय ढाले….!

bol maharashtra

माहेर संस्थेत महिला मेळावा उत्साहात संपन्न ..!

bol maharashtra

प्रजासत्ताक दिनी जिल्हा प्रशासनाला गुरुदेवने धरले धारेवर

bol maharashtra