Bol Maharashtra
निवडणूक मोठी बातमी राजकारण

मा .जि .प . सदस्या कुसुम मांढरे यांची उमेदवारी अखेर मागे ..!

 

प्रतिनिधि 🖊️ संदिप ढाकुलकर

मा . जि . प . सदस्या कुसुम मांढरे यांची उमेदवारी अखेर मागे ..!

शिक्रापूर (पुणे) येत्या पाच तारखेला होऊ घातलेल्या पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकी साठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या मा . जिल्हा परिषद सदस्या कुसुम आबा मांढरे यांनी आज शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार यांच्या गटाकडून इच्छुक असलेल्या उमेदवार कुसुम मांढरे यांना पक्षाने तिकीट नाकारत मोनिका हरगुडे यांना तिकीट दिल्यामुळे नाराज कुसुम मांढरे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. पण आज बऱ्याच घडामोडीनंतर शिरूर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार माऊली आबा कटके,आबा राजे मांढरे ,आणि कुसुम मांढरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत आज शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. या भेटीनंतर पक्षाकडून कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी पक्षाकडून घेतली जाईल असे सूतोवाच या दरम्यान अजित पवार यांनी काढल्याचे वृत् आहे . या दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आबा मांढरे यांना योग्य तो सन्मान दिला जाईल हा शब्द वरिष्ठाकडून मिळाल्यानंतर आज अखेरच्या दिवशी कुसुम मांढरे यांनी आपला अर्ज मागे घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे

 

Related posts

विधानसभा सामान्य निर्वाचन के मद्देनजर पुलिस और SSB की सयुंक्त टीम ने किया फ्लैग मार्च्

Web1Tech

अखेर माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद सदनिका घोटाळ्यात गेलेच…!

bol maharashtra

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व सहकार क्षेत्रात शिवसेची शक्ति वाढली,अनेक दिगग्ज शिवसेनेत…

bol maharashtra