Bol Maharashtra
निवडणूक

2026 सार्वत्रिक निवडणुकीत मतदार यादया मध्ये सावळा गोंधळ….!

 

प्रतिनिधि संदीप ढाकुलकर

2026 सार्वत्रिक निवडणुकीत मतदार यादया मध्ये सावळा गोंधळ….!

(पुणे) पिंपरी चिंचवड महानगर पालिका सार्वत्रिक निवडणुक -2026 मध्ये
मतदारांच्या यादीतच सावळा गोंधळ,शेजारच्या गावातील मतदारांची नावं दुसऱ्या म्हणजे प्रभाग क्र. 30 दापोडी- फुगेवाडी -कासारवाडी या यादीत सदर नावं समाविष्ट आहे.
याबाबत सूत्राच्या माहिती प्रमाणे संपर्क साधण्यासाठी स्थानिक रहिवाशी यांनी पि.चि.म.न.पा. ‘ह’ प्रभाग येथील कार्यालयात सौ. दूधनाळे यांच्याशी याबाबत वार्ता केली यावर त्यांनी आम्हालाही काम असतात, या गोंधळात आता वेळ नाही, आम्ही याविषयी बोलू शकत नाही असं सांगितलं.
यातून सर्वं सामान्य मतदार राजाने काय समजायचं,हे फक्त याच प्रभागातच आहे का अजून इतर कुठल्या प्रभागात, शहरात झाले नसेल कशावरून,
मग ह्या निवडणूकच घेता कशाला, हा प्रश्न सर्वं सामान्य नागरिकं व कार्यकर्ते यांना पडला आहे.
यांना काहीही करून सर्वं यंत्रणा ताब्यात घेऊन बहुमतासाठी लोकशाहीच संपवायचा तर डाव नाही ना. हे चित्र या निवडणुकीच्या रूपाने आपल्याला पहायला मिळत असून आणखीन काय काय पहायला मिळणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे, याला दुग्ध शर्करा योग म्हणजे मकर संक्रात होय, यंदा पैशावर चांगल्या आर्थिक दृष्टीने संक्रात नक्कीच असणार, मतदार राजासाठी एक पर्वनीच ठरणार आहे.या निवडणुकी पैशांचा महापूर अमिष, प्रलोभण ही मतदार राजाला दाखवली जाणार आहेत हे मात्र तितकेच खरं

Related posts

आर्णीत काँग्रेसचे नालंदा भरणे नगरादयक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ची मुसंडी,शिवसेना ४ तर शिवसेना उबाठा १ व भाजप ने खाते खोलले…!

bol maharashtra

अखेर चंद्रपुरात भाजप व शिवसेना उबाठा एकत्र..?

bol maharashtra

घाटंजीतून फुंकले काँग्रेसने जिल्हा परिषद निवडणुकीचे रणशिंग…!

bol maharashtra