Bol Maharashtra
सामाजिक

शाश्वत उपजीविका कार्यात परसोडा ग्रामपंचायत अव्वल: रूपा भादलकर

परसोडा ग्रामपंचायत शाश्वत उपजीविका कार्य उत्तम प्रकारे राबविण्यात जिल्ह्यात अग्रेसर -रूपा भादलकर
*ग्रामपंचायत द्वारा राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची पाहणी.*
आर्णी :तालुक्यातील अनेक उपक्रम राबवून नाव लौकिक व पुरस्कार प्राप्त परसोडा ग्रामपंचायत द्वारे शाश्वत उपजीविका कार्यक्रम उत्तम प्रकारे राबवून जिल्ह्यात अग्रेसर असल्याचे मत रिलायन्स फाउंडेशन महाराष्ट्र च्या उपजीविका तज्ञ रूपा भादलकर यांनी परसोडा गावाच्या पाहणी दरम्यान व्यक्त केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान उत्तम प्रकारे राबविणाऱ्या परसोडा ग्रामपंचायत द्वारा शाश्वत उपजीविका अंतर्गत अनेक उपक्रम राबविण्यात आले ह्या सर्व उपक्रमाची पाहणी व भेटी करिता रिलायन्स फाउंडेशन महाराष्ट्र च्या उपजीविका तज्ञ रूपा भादलकर आल्या असतांना त्यांनी परसोडा ग्रामपंचायत उत्तम प्रकारे उपक्रम राबवून जिल्ह्यात अग्रेसर असल्याचे मत व्यक्त केले. ह्यावेळी त्यांनी परसबाग भेट,शेळीपालन व्यवसाय, एकमिकत्मिक शेती पद्धती, नाडेप खत युनिट, बचत गट व्यवसाय, पिठ गिरणी व्यवसाय, शेण गोरी व्यवसाय ईत्यादी उपक्रमाची पाहणी करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.रिलायन्स फाउंडेशन यवतमाळ जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक विलास मालाधारी, तालुका कार्यक्रम अधिकारी वैभव गायकी व प्रदीप पवार यांनी मार्गदर्शन केले ह्यावेळी सरपंच प्रा सौं स्वप्ना अतुल पाटील देशमुख, उपसरपंच सुनंदा पत्रे, ग्रामविकास अधिकारी दिग्विजय मुंडवाईक, माजी सरपंच अतुल पाटील देशमुख, अरुण देशमुख,ज्ञानेश्वर मिसाळ, शंकर कोल्हे, गजानन शेळके,नारायण सोळंके, स्वप्नील राठोड, सुनिल राठोड, नितेश आडे रोहिदास तुवर, राहुल तुवर, रोहन तुवर, कुंदन पवार, आशा सोळंके, मंदा कोल्हे, सारिका कोल्हे, राजश्री कोल्हे, रुखमा आडे यांची उपस्थिती होती.

Related posts

डॉ.नीरज वाघमारे यांच्या पुढाकाराने पोलीस भरती मार्गदर्शन मेळावा; प्रा.विठ्ठल कांगणे यांचे सखोल मार्गदर्शन

bol maharashtra

कष्टकरी माणसाचा आवाज बाबा आढाव निवर्तले…!

bol maharashtra

रस्त्यात झाड लावून गांधीगिरी ..! प्रहार च्या आंदोलनास यश रस्त्याचे काम झाले सुरू.

bol maharashtra