Bol Maharashtra
सामाजिक

आर्णी च्या विकासासाठी वचनबद्ध, कर वाढी विरोधात शिवसेना नागरिका सोबत:राजुदास जाधव…!

आर्णी शहराच्या विकासाला शिवसेना प्राधान्य देईल त्यासाठी वचनबद्ध राहील शहरात ज्या पद्धतीने अचानक कर मूल्य वाढ झाली त्याविरुद्ध व्यापारी नागरिकांत असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळे शिवसेना नेहमीच शहरातील नागरिकांच्या भावनांचा आदर करून कर वाढीस शिवसेना पदाधिकारी नगरसेवक सभागृहात विरोध दर्शवतील असा शब्द शिवसेना यवतमाळ जिल्हा प्रमुख राजुदास जाधव यांनी आर्णी च्या शिस्टमंडळास दिला.

आर्णी नगरपरिषद कर आकारणी विरोधात व्यापाराचे शिष्टमंडळ शिवसेना जिल्हाप्रमुखांना भेटले…
…………………………………….. आर्णी नगरपरिषदेने प्रशासकीय कार्यकाळात आर्णी शहरात कर आकारणी केली असून ही कर आकारणी अत्यंत आवाज भी करण्यात आली आहे. या कर आकारणीमुळे आर्णी शहरात प्रचंड असंतोष असून या कर प्रणाली विरुद्ध
आज आरडी येथील प्रतिष्ठित व्यापाऱ्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख राजुदास जाधव यांची भेट घेऊन कर प्रणाली बाबत नगरपालिकेच्या सभागृहामध्ये योग्य तो निर्णय घेण्याबाबत विनंती केली.
नगरपालिकेकडून नियमबाह्य कर आकारणी झाली असल्यास सभागृहामध्ये आमच्या नगरसेवकाकडून आवाज उठवण्यात येईल व आरडीकरांना दिलासा देण्याचे दृष्टीने कायदेशीर कर आकारणी करण्याकरिता आमचे नगरसेवक प्रयत्नशील राहील अशी अभिवचन राजुदास जाधव यांनी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले. या शिष्टमंडळात शितल कोठारी, विठ्ठल देशमुख, प्रवीण मुलगीनवार, भिकू भाई पटेल, प्रवीण मुंदलवार, गणेश शि हीरोळे, बेलगमवार, आदी व्यापारी मित्रांचा समावेश होता. याप्रसंगी विधानसभा संघटक जाकीर सोळंकी शिवसेना शहरप्रमुख सुरेश पवार, राजू राठोड अनिल गेडाम उपस्थित होते.

Related posts

रुग्ण सेवेला समर्पित चंदन राठोड…! नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन, लाभ घेण्याचे आवाहन…!

bol maharashtra

महापरिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन..

bol maharashtra

पाण्याचे महत्व जाणून एकोप्याने परसोडा ग्रामपंचायत ने बांधला ‘वनराई’ बंधारा…!

bol maharashtra