पाया मजबूत असल्यावरच संघटन पुढे चालते…
अनंता गावंडे
आर्णी
आर्णी सायकलींग क्लबच्या आठव्या वर्धापन दीनाच्या महालक्ष्मी लाॅन मधिल आयोजित कार्यक्रमामधून अध्यक्षीय भाषणामधून माजी जिल्हा परिषद सदस्य अनंता गावंडे बोलत होते.
आर्णी सायकलींग क्लब आज आठ वर्षाचा
झाला आहे.
यावरुनच अंदाज येतो याचा पाया कीती
मजबूत आहे.
आर्णी सायकलींग क्लबने शहरात
सायकल चालवा,
फीट राहा.. हा संदेश आठ वर्षापुर्वी दीला.
पाच मित्रांनी एकत्र येवून याची मुहूर्तमेढ रोवली.
हळूहळू आपल्या विचाराचे विविध क्षेत्रातील,वयोगटातील लोक जोडत विस्तार केला.
लोकांना फीट राहण्याचा सोपा मार्ग शहरात प्रशस्त केला.
सोबतच इतरही चांगल्या बाबी केल्या.
यात वॄक्ष लावने,
प्लास्टीक चा वापर टाळून कापडी पिशवी वापरण्याचा कॄतीमधून संदेश दीला.
अनेक पर्यावरण पुरक उपक्रम राबवले.
सायकलने लांब पल्याच्या राईड
केल्या.
आठ वर्षापुर्वी
पाच लोकांनी एकत्र येवून सायकल चालवली ती सायकल आज वाढत जावून आरोग्यासाठी जागरुक असणार्या
७७ लोकांच्या समुहापर्यत पोहचली आहे.
समुह वाढला.
समुहातील एकोपा वाढला,
म्हणूनच आज आठ वर्ष पुर्ण करत आहोत.
मी स्वत पाच मित्रापैकी
एक आहे.
याचा मला
आनंद आहे.
असे माजी जिल्हा परिषद सदस्य
अनंता गावंडे यांनी बोलताना सांगितले.
यावेळी आर्णी सायकलींग क्लबचे सर्व सद्स सहपरिवार उपस्थित होते.
प्रमुख अतिथी म्हणून मंचावर आर्णीचे नगराध्यक्ष नालंदा भरणे,
पुसद चे मॅराॅथानपटू अजय कोटलवार,
नंददीप फाऊंडेशन यवतमाळ
चे अध्यक्ष
संदीप शिंदे,
आर्णीचे व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ता राजेश श्रीवास,
आर्णी सायकलींग क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष नालमवार,
माजी अध्यक्ष
संदीप ढोले,
यावेळी मंचावर उपस्थित होते.
आर्णी सायकलींग क्लबच्या आठव्या वर्धापन दीनाच्या निमीत्ताने यावर्षीचा दीला जाणारा कार्यभुषण पुरस्कार यवतमाळ च्या नंदादीप फाऊंडेशन ला देण्यात आला.
नंदादीप फाऊंडेशने बेघर मनोरुग्णाचा सांभाळ ते पुनर्वसन करण्याचे मोठे काम मागिल अनेक वर्षापासुन संदीप शिंदे,नंदनी शिंदे,
ह्या दाम्पत्याने अविरतपने,सातत्याने केले आहे.
याच बहुमुल्य कामाची दखल घेत हा पुरस्कार आर्णी सायकलींग क्लब कडून यावर्षी नंदादीप फाऊंडेशन ला देण्यात आला.
यावेळी आर्णीचे नगराध्यक्ष नालंदा भरणे, सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे आर्णीचे उद्योजक राजेश श्रीवास,
पुसदचे मॅराॅथानपटू अजय कोटलकर यांचा देखिल यावेळी मान्यवराच्या हाताने गौरव करण्यात
आला.
नुकतीच १४०० कीलोमीटर
सायकलने उदगिर ते
सोमनाथ,व्दारकाची यशस्वी यात्रा करणारे आर्णी सायकलींग क्लबचे
माजी अध्यक्ष
प्रमोद बुटले,
आर्णी ते पंढरपूर सायकलने जाणारे,
सुनिल जयस्वाल,
सुनिल राणे,
अमोल देशमुख,
सतिश पाचखंडे,
तर राज्यस्तरीय सायकलींग स्पर्धेत आर्णीचे नाव गाजवणारी १४ वर्षाची चिमुकली प्रिया पिसरवार,
हीचा ही मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.
यावेळी आर्णी सायकलींग क्लब चे सर्व सद्स सहपरिवार उपस्थीत होते.
याचवेळी आपल्या उत्कृष्ट गायनाने सर्वाचे मन जिंकणारे
गायक
आकाश अक्कावार,
विजय राठोड,
लक्ष्मण खाडे यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी महीलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध खेळ घेण्यात आले.
यामध्ये
रेखा हरीश राठोड,
तर कार्यक्रमाला वेळेत हजेरी लावण्याचा बहूमान
निशा कीरण चव्हान यांना मिळाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल देशमुख, संचालन प्रविण काळे यांनी केले,
तर आभार
हरिओमसिंह बघेल यांनी मानले.
