Bol Maharashtra
साहित्य

नाविण्यापुर्ण उपक्रम राबवून परसोडा ग्राम पंचायत नाव लौकिकास प्राप्त -मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की

नाविण्यापुर्ण उपक्रम राबवून परसोडा ग्राम पंचायत नाव लौकिकास प्राप्त -मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की
*मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान स्पर्धेच्या तयारीची पाहणी व घरकुल भूमिपूजन सोहळा*
आर्णी:मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ह्या महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेल्या उपक्रमात अनेक ग्रामपंचायत ने सहभाग नोंदविला परंतु नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून स्पर्धेत आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या परसोडा ग्रामपंचायतची जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी पाहणी केली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत ने स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला. गाव खऱ्या अर्थाने समृद्ध करणे करिता महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविले आहे ह्यात तालुक्यातील परसोडा गावाची तयारी कश्या पद्धतीने चालू आहे ह्याचे पाहणी करणे करिता व घरकुल लाभार्थी यांचे भूमिपूजन करिता जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की आले असताना गावातील नाविण्यापुर्ण उपक्रम याची पाहणी करून परसोडा गाव जिल्हास्तरीय पुरस्कार चे स्पर्धेत असून अश्याच प्रकारची तयारी करावी असे ग्रामस्थांना सांगितले. प्राथमिक मराठी शाळा जिल्हा परिषद चे विध्यार्थी यांनी लेझीम पथका द्वारे पत्की साहेबांचे स्वागत करण्यात आले.ह्यावेळी आर्णी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश खारोडे, विस्तार अधिकारी इंगोले, ठाकरे, बघेल यांची प्रमुख उपस्थिती होती तर सरपंच प्रा सौ स्वप्ना अतुल देशमुख, माजी सरपंच अतुल पाटील देशमुख, उपसरपंच सुनंदा पत्रे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर राठोड, अजाब पत्रे, मंगला चौधरी, जिप शाळेचे मुख्याध्यापक बाबाराव वानखडे, नारायण वेट्टी यासंह महिला बचत गटाचे सदस्य, ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Related posts

राजेंच्या भूमीत बिब्बाकार गरजला,’आमची जिंदगी लाकूडफाटा’कवितेतून विजय ढाले यांचा व्यवस्थेवर प्रहार…!

bol maharashtra

इजनी च्या मुख्याध्यापकाने केला भंगारावर हाथ साफ,पवन पाचकोरे यांनी केली तक्रार…!

bol maharashtra

टोळी कुठं सुरक्षित रहाते भडे गेल्यावर, कवी विजय ढाले यांची अप्रतिम रचना..!

bol maharashtra