Bol Maharashtra
Last 24 Hour सामाजिक साहित्य

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन शालेय साहित्य भेट…..

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन शालेय साहित्य भेट…..
आर्णी :-
गरिबांच्या मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून शहरातील मातोश्री शांताबाई तु चव्हाण विद्यालय आर्णी येथील शिक्षक नवनवीन उपक्रम राबवीत असतात. शाळेतील गरिब कुटुंबातील विद्यार्थी जे दैनंदिन शाळेत उपस्थित असतात परंतू त्यांचेकडे शालेय साहित्य खरेदी करण्याची परिस्थिती नसते अशा विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक दत्तक घेऊन त्यांना वर्षेभर लागणारे शालेय साहित्य भेट देत असतात. हि परंपरा यावर्षी पासुन चालु केलेली आहे.
मुख्याध्यापक मंगेश ब्रम्हकार शिक्षक सचिन शिंदे, किशोर लाखकर, दिपमाला कावळे,तुपे सर व लिपिक राहुल चव्हाण यांनी शाळेतील गरजु गरिबांच्या मुलांना बुक, पेन, पेन्सिल, स्केल इत्यादी साहित्य भेट देऊन. नियमित उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या उपस्थितीती करीता नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असुन शालेय अभ्यासक्रमासोबत सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणून नवोपक्रम हाती घेतले आहे. शालेय शैक्षणिक सहल, सांस्कृतिक कार्यक्रम, क्षेत्रभेट, शैक्षणिक खेळ, विविध क्षेत्रातील खाजगी संस्था, उद्योग समुहांना भेटी देऊन माहिती संकलित करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येते.
विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये विद्यार्थी शिक्षणा सोबत जीवनावश्यक पैलूंना आत्मसाद करतात. त्यामुळे परिसरातील या शाळेचे कौतुक केले जात आहे..

Related posts

मराठा सेवा संघाच्या माढा तालुका सचिवपदी सहाय्यक अभियंता सुरज मोहिते.

bol maharashtra

राज्य मराठी पत्रकार परिषद शिरूर ता. नवीन कार्यकारणी जाहीर

bol maharashtra

९ ऑगस्टला केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या घरावर धडकणार, १ दिवसीय लाक्षणिक उपोषणात बच्चू कडूंचा एल्गार..!

bol maharashtra