Bol Maharashtra
निवडणूक मोठी बातमी राजकारण

आर्णी नगरपरिषद कोणासही बहुमत नाही,युती शिवाय पर्याय नाही…!

नगरादयक्ष काँग्रेस चा बहुमत मात्र महायुती कडे..
नुकत्याच पार पडलेल्या आर्णी नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नगरादयक्ष पदाचे उमेदवार नालंदा भरणे विजयी झाले. तसेच त्यांचे ८ नगरसेवक निवडून आले व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे ८ नगरसेवक निवडून आले. आता उपाध्यक्ष विषय समिती सभापती हे ही महत्वाचा भाग असेल…!
आता नगरादयक्ष पदाला व नगरसेवक यांना मिळून संख्याबळ ९ होते एकूण सदस्य संख्या २३ असल्याने बहुमतासाठी १२ चे संख्याबळ आवश्यक आहे.
ते स्वबळावर काँग्रेस कडे नाही तर दुसरी कडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक नगरसेवक आहे ही संख्या काँग्रेस कडे झाली तरी १० होते तर राष्ट्रवादी काँग्रेस ८ व शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या कडे ४ नगरसेवक आहेत तर भाजप कडे १ संख्या आहे महा युती चे गणित जुळले तर ८ राष्ट्रवादी ४ शिवसेना व भाजप१ असे १३ संख्याबळ होते .शिवाय हे तिन्ही पक्ष वेगवेगळे लढले तरी राज्य पातळीवर तिन्ही पक्ष सत्तेत आहेत.अन विकासासाठी हे तिन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात.पालकमंत्री शिवसेनेचे संजय राठोड असल्याने जिल्हा नियोजन चा निधी शहराच्या विकासाला मिळू शकतो त्यामुळे महा युती होण्यासाठी स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस साजिद बेग,शिवसेना जिल्हा प्रमुख राजुदास जाधव व विद्यमान आमदार प्रा.तोडसाम यांची भूमिका महत्त्वाची आहे.महा युती चे कार्यकर्ते मात्र सत्तेत महा युती साठी अनुकूल दिसत आहेत

Related posts

काँग्रेस शहराध्यक्षाला विजयाचा गुलाल पक्ष नेते सहकारी आनंदले…!

bol maharashtra

किरीट सोमय्या यांच्या त्या दौऱ्याने आर्णीत विविध चर्चेला पेव…!

bol maharashtra

निवडणूक निकाल लांबणीला,उमेदवार लोकांचा जीव टांगणीला..!

bol maharashtra